बीडमध्ये राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर प्राणघातक हल्ला सजंय जाधव यांच्यावर कोयत्याने सपासप वार; गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार सुरू
- Navnath Yewale
- Apr 20
- 1 min read

बीड: बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यावर प्राणघातक हल्ह्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीडच्या परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय जाधव यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात संजय जाधव गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गेल्या दोन वर्षापासून परळी तालुक्या गुन्हेगारांचे धाडस वाढले आहे. सामान्य नागरिकांसह आता राजकीय नेत्यांवरही भर रस्त्यावर प्राणघातक हल्ल्यांचे प्रकार समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय जाधव यांच्यावर रविवारी (दि.19) रात्री उशीरा 5 ते 6 अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने सपासप वार करून जीवघेणा हल्ला केला. या भीषण हल्ल्यात संजय जाधव गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान रवीवारी रात्री 11:30 च्या दरम्यान संजय जाधव हे गोवर्धन हिवरा ते सिरसाळा रोडवर असलेल्या आपल्यसा शेतकाडून घराकडे जात होते. गोवर्धन शिवारात दबा धरुन बसलेल्या 5 ते 6 अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अडवून अचानक त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने जाधव यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर अनेक वार करण्यात आले. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बाजार समितीच्या माजी पदाधिकार्यावरील प्राणघातक हल्ल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या हल्ल्यामागचे नेमके कारण समोर आले नाही. याबाबत परिसरात विविध चर्चांना उधान आले आहे. काही दिवसांपूर्वीच संजय जाधव यांनी गावातील एका तरुणाला मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या पार्श्वभूमीवर, हा हल्ला त्याच वादातून झाला असावा का? असा संशय व्यक्त केला जात आहे. तो व्हायरल व्हिडिओ आणि आता झालेला हा प्राणघातक हल्ला या घटनांची जिल्ह्यात मोठी चर्चा आहे. परळी पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.



Comments