top of page

बीडमध्ये शाळेला संतोष देशमुख यांचे नांव; पुतळाही उभारणार




बीडमध्ये मराठा-वंजरा अशी सुप्त समाजिक तेढ निर्माण झालेली असतानाच आता साजाकि सलोख्याच एक वेगळं चित्र निर्माण झालं आहे. वंजरा समाजाच्या नेत्याच्या शिक्षण संस्थेच्या शाळेला स्व.सतोष देशमुख यांच नाव देण्यासह शाळेच्या आवारात स्व देशमुख यांचा पुतळा उभारण्याचा निमर्णय दस्तुरखुद्द संस्थाचालकाने घेतला आहे.


नवनिर्माण शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी सोमवारी धनंजय देशमुख यांची मस्साजोग येथे भेट घेतली. दोघांच्या चर्चेनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बाळा बांगर हे ज्येष्ठ नेते रामकृष्ण बांगर यांचे पुत्र असून ते वंजारा समाजाचे आहेत. दरम्यान, वाल्मिक कराड याने त्यांची शिक्षण संस्था लूबाडण्याचा प्रयत्न केला होता. त्या अणुषंगाने बांगर कुटुंबीयांना त्रासही देण्यात आला होता असा आरोप आमदार संदिप क्षीरसागर, सुरेश धस यांनी यापूर्वी केला.

बळा बांगर हे संस्थेच्या शाळेला संतोष देशमुख यांच नाव देणार असून शाळेच्या आवारात पुतळा उभारणार आहेत. याशिवाय शाळेच्या इमारतीचे उद्घाटन व पुतळ्याचे अनावरण देशमुख कुटुंबियांच्या हस्ते येत्या काही दिवसात करणार असल्याचे बाळा बांगर यांनी सांगितले. दरम्यान, बाळा बांगर यांनी सोमवारी स्व. संतोष देशमुख यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधला व धनंजय देशमुख यांनी उभारलेल्या न्यायाच्या लढ्यामध्ये बांगर कुटुंबीय शेवटपर्यंत सोबत राहिल अशी ग्वाही दिली.


धनंजय देशमुख म्हणाले की, अण्णांनी समाजासाठी काम केले. त्यांचे विचार आम्ही सर्वजन पुढे घेऊन जाणार आहोत. बांगर यांनी चांगला संकल्प केला आहे. आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत हा लढा थांबायचा नाही. संतोष आण्णा देशमुख यांचे विचार पुढे आणून स्वप्न पूर्ण करायचे आहे.

Comments


bottom of page