top of page

बीडमध्ये सख्या भावंडाचा दुर्दैवी मृत्यू



संतोष देशमुख यांच्य निघर्र्ून हत्ये नंतर बीड जिल्हा सातत्याने चर्चेत राहिला आहे. मारहाणचे विविध व्हिडीआ समोर येत असल्याने बीड कायम राज्याच्या पटलावर आहे. अता कोयाळा (ता. धारूर) येथे एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. संर्पदंशामुळे एका कुटुंबातील सख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना (24 मे) मध्यरात्री 12 ते 1 च्या सुमारस घडली. दरम्यासन दोन्ही भावंडे झोपीत असताना हा प्रकार घडला असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


प्राप्त माहितीनुसार कोयाळा येथील प्रदिप मधुकर मुंडे यांच्या राहत्या घरी प्रदिप मुंडे यांची सात वर्षाची मुलगी कोमल आणि पाच वर्षाचा मुलगा शिवम हे रात्री झोपेत असताना त्यांच्या अंगावर साप आला व त्याने दोघांना दंश केला. दंशानंतर दोन्ही चिमुकल्यांची तब्येत अचानक बिगाडली. घटनेची माहिती कुटुंबियांना कळताच त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांनीही प्राण सोडले.


या घटनेमुळे संपूर्ण कोयाळा गावावर शोककळा पसरही असून मुंडे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सर्पदंशामुळे एका घरतील दोन निष्पाप जीवांचा बळी गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सध्या पावसामुळे जमिनीमध्ये पाणी शिरल्याने बिळातून साप बाहेर पडत आहेत. गावखेड्यांसह वाडी वस्ती तांड्यावरील नागरिकांनी सावधानता बाळगावी याशिवाय शेतात काम करताना दडपण असलेल्या ठिकाणी निरिक्षण करूनच काम करावे.

Comments


bottom of page