बीड पुन्हा हादरले: भाच्याचा मामाच्या 10 वर्षीय बालिकेवर अत्याचार 29 वर्षीय भाच्या विरोधात पोलिसात गुन्हा; फरार भाच्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- Navnath Yewale
- May 6
- 1 min read

मामा-मामी रात्री शेतात पाणी देण्यासाठी गेल्याचे पाहून रात्री घरात एकटी असलेल्या मामाच्या 10 वर्षाच्या बालिकेवर भाच्याने अत्याचार केला आहे. इतकेच नाही तर आरोपी मामा घरी येण्या अगोदार घरातून फरार झाला.
बीडच्या केज तालुक्यात असलेल्या युसूफ वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अत्याचाराची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मामाच्या गावाला आलेल्या 29 वर्षीय भाच्याने मामाच्या मुलीवर अत्याचार केला आहे. या घटनेने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.
10 वर्षीय मामाच्या मुलीवर अत्याचारा नंतर आरोपी मामा घरी येण्या आगोदर पसार झाला. दरम्यान, आई-वडिल घरी आल्यानंतर मुलीने घडला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आई-वडिलांनी तत्काळ पोलिस ठाणे गाठून आरोपी भाच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या आई- वडिलांच्या तक्रारीवरुन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी फरार आरोपीचा शोध घेवून त्यास इटकुर येथून अटक केली आहे. तपास युसूफ वडगाव पोलिस करत आहेत.
दरम्यान, युसूफ वडगाव पोलिस ठाणे हद्दीत गेल्या तीन दिवसातील महिला अत्याचाराची ही तिसरी घटना आह पहिली घटना आजोबांनी स्वत:च्या नातीवर अत्याचार केला. अंगणवाडी सेविकेला लस्सीमधून गुंगीचे औषध देवून वारंवार अत्याचार करण्यात आल्याची आणि आज (दि. 6) बुधवार रोजीची ही तिसरी घटना आहे.



Comments