बीड मध्ये चालंलय तरी काय?गावगुंडाकडून शेती बळकावण्याचा प्रयत्न, शेतकरी भयभित
- Navnath Yewale
- Apr 7
- 1 min read

दगडवाडी शिवारातील राजुरी-चिंचपूर मार्गालगत सिताराम नागरे, बाबासाहेब नागरे, रवींंद्र नागरे, किसन कठाळे, राम नागरे, गणेश कठाळे, महादेव कठाळे या शेतकर्याची वडीलोपार्जीत शंभर एक्करावर जमिन आहे. रस्त्यालगत जमिन असल्याने व्यवसायीकदृष्ट्या परिसरात चिंचरपूर-राजूरी न. मार्गामुळे जमिनीला महत्व प्राप्त झालं आहे. गावातील जनावरं चारण्यासाठी जमिन असल्याची बतावणी करुन राजकिय वरदहस्त असलेल्या गावगुंडाकडून शासन प्रशासनाची दिशाभूल केली जात आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिन ताब्यात घेण्यासाठी आंदोलन, निवेदनाच्या माध्यमातून जमिन बळकविण्याचा प्रयतन केला जात आहे.
वडिलोपार्जीत शेतजमिन कसण्यासाठी शेतकर्यांना गावगुंडाकडून मज्जाव करण्यात येत असून गुंडाकडून मारहाण करण्यात येत असल्याचा आरोपही शेतकर्यांनी केला आहे. दरम्यान, शासन, प्रशासनाची दिशाभूल करुन जमिन ताब्यात घेवून ती पवनचक्कीसह इतर खासगी कंपण्यांच्या घश्यात घालण्यासाठी गावगुंडाकडून कागदी घोडे नाचविण्यात येत असून प्रसंगी हुकूमशाहीचा मार्ग अवलंबून शेतकर्यांना मारहाण करण्यात येत असल्याचा आरोप करत गावगुंडाच्या आकाचा शोध घेवून त्यांच्यावर कठोर कावाईसाठी शेतकर्यांनी शासन, प्रशासन दरबारी धाव घेतली आहे.
राजकिय वरदहस्त असल्याने पोलिस यंत्रणेकडून शेतकर्यांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. पोलिसच काय प्रशासनातील कोणत्याच यंत्रणेकडून आपलं काही होवू शकत नसल्याच्या अविर्भाने पाच लाख रुपये आणि एक एक्कर जमिनीची मागणी करत गावगुंडाकडून वारंवार धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही शेतकर्यांकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख यांची हत्या पवन उर्जा प्रकल्पाचा संभाव्य संबध आहे का? याची चौंकशीची मागणी शेतकर्यांसह नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
Comments