top of page

बीड हादरलं : गायराण जमिनीच्या वादातून तरुणाची निर्घुन हत्या शिरुर पोलिसात अरोपींच्या विरोधात अनुसूचित जमाती कयद्यान्वये खुनाचा गुन्हा

May 16
2 min read

बीड: राज्यभरातील गायराण जमिनींसाठी राज्य सरकार कायदे, योजना राबवत असले, तरी त्याची सक्षम, अमंलबजावणी होत नाही. गायराण जमिनी विषयी शासनाचे तकलादू धोरण अनेकवेळा गायराण धारकांच्या जीवावर बेल्याचे वारंवार समोर येत आहे. त्यातूनच शनिवारी (दि. 16) पाडळी (जि. बीड) येथील आदिवासी समाजाच्या गायराण धारक युवकाला आपला प्राण गमवावा लागला आहे. शंकर बर्डे असे मयत तरुणाचे नाव आहे.


गावशिवारातील गायराण जमिन मोकळी कर असे म्हणत गावातील काही गावगुंडांनी शंकर बर्डे यास पाच दिवसांपूर्वी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसी तक्रार शंकर याने पोलिस ठाण्यात दाखल केल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. गायरण जमिन मोकळी (खाली) कर म्हणत गावातीलच पाच ते सहा जणांनी शुक्रवारी शंकर बर्डे यास डोक्यात लोखंडी सळया, बांबुच्या काठ्याने जबर मारहाण करून त्याचा खून केला.


याबाबत माहिती अशी की, पाडळी, ता. शिरुर कासार (जि.बीड) गावशिवारातील गायराण जमिन कसून उपजिवीका भागवत असलेल्या शंकर अंकुश बर्डे (वय 25) यास तु आमच्या शिवारातील गायरान जमिन मोकळी कर, असे म्हणून गावातील काहींनी पाच दिवसांपूर्वी धमकावत जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यावर शंकर बर्डे यांने सबंधितांच्या विरोधात शिरुर कासार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी नेहमी प्रमाणे गायराण जमिनीबाबत किरकोळ वाद असल्याचं समजून तक्रार गांभीर्याने घेतली नसल्याचा अरोप नातेकवाईकांनी केला आहे. शंकर बर्डे याने दिलेल्या तक्रारीची तात्काळ दखल घेवून पोलिसांनी वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई केली असती, तर आज शंकरचा जीव गेला नसता असाही आरोप नातेवाईकांनी केला आहे.


शुक्रवारी (दि.15) पाडळी येथील नाना सरवदे, हरी किसन पाखरे, अक्षय सरवदे, तात्याराम कंठाळे, अंकुश अवंतकर, पिनु इंगळे (घोडेवाला), नारायण इंगळे, बिबिशन इंगळे, हमिद शेख (मुकादाम), सोनाजी सरवदे, व इतर पाच ते सहा सर्व रा. पाडळी यांनी शंकर बर्डे यास ‘ भील्ट्यांनो गायरान जमिन खाली करा असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करत लोखंडी गज, येळूच्या काठ्याने डोक्यात, हाता-पायावर जबर मारहाण केली. या मारहाणीत शंकर बर्डे याचा मृत्यू झाला. अंकुश शिवाराम बर्डे (रा. पाडळी) यांच्या फिर्यादीवरुन नाना सरवदे, हरी किसन पाखरे, अक्षय सरवदे, तात्याराम कंठाळे, अंकुश अवंतकर, पिनु इंगळे (घोडेवाला), नारायण इंगळे, बिबिशन इंगळे, हमिद शेख (मुकादाम), सोनाजी सरवदे, व इतर पाच ते सहा सर्व रा. पाडळी यांच्या विरोधात शिरुर कासार पोलिस ठाण्यात अनुसूचित जमाती कायद्यान्वये खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आष्टीचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कटके यांनी घटनास्थळास भेट दिली आहे.


मुख्य आरोपीत अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत नातेवाईकांनी शिरुर पोलिस ठाण्यात ठिय्या मांडल्याने दिवसभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर प्रभारी उपविभागीय अधिकारी अनिल कटके, पोलिस निरिक्षक जाधव यांनी नातेवाईकांची समजूत घालून आरोपींना सोडले जाणार नसल्याचे अश्वासन दिल्याने मृतदेहावर पाडळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.


... तर शंकरचा जिव वाचला असता?: गायराण जमिनीवरुन जातिवाचक शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार शंकर याने शिरुर पोलिसात पाच दिवसांपूर्वी दाखल केली होती. प्रकरणाचे गांभीर्य राखून शिरुर पोलिसांनी किमान प्रतिबंधक कारवाईचीही तसदी घेतली असती, तर आज शंकरचा जिव वाचला असता अशा भावना व्यक्त करत नातेवाईकांनी शिरुर पोलिस ठाण्यासमोर आरोपींच्या अटकेसाठी टाहो फोडला.

Comments


bottom of page