top of page

बुलेट ट्रेन: अता, 508 किमीचा प्रवास पूर्ण होणार फक्त 3 तासांत! पहिली बुलेट ट्रेन मुंबई- अहमदाबाद मार्गावर धावणार



भारत आता हाय-स्पीड रेल्वे प्रवासाच्या युगात प्रवेश करणार आहे. मुंबई ते अहमदाबाद या देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे आणि 2028 पर्यंत, ते पूर्णपणे कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. हा हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प भारत आणि जपानमधील तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी सहाकार्याचे एक उत्तम उदाहरण आहे. सध्या मुंबई ते अहमदाबाद प्रवास करण्यासाठी सुमारे 8 तास लागतात परंतु, बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर, हा वेळ फक्त 3 तासांवर येईल. या 508 किमी लांबीच्या मार्गावर धावणारी ही ट्रेन देशाला अशा निवडक देशांच्या यादीत जोडेल, जिथे समर्पित हाय-स्पीड रेल्वे नेटवर्क उपलब्ध आहे.


असा असेल बुलेट ट्रेनचा मार्ग

ही हाय-स्पीड ट्रेन गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरांना जोडेल. एकूण 12 स्थानके नियोजित आहेत. या स्थानकांमध्ये प्रामुख्याने मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, सुरत, भरूच, वडोदरा आणि अहमदाबादचा समावेश आहे. मुंबईतील स्टेशन भूमिगत बांधले जाईल जेणेकरून प्रवाशांना मेट्रो आणि लोकल ट्रेनशी सहज जोडता येईल. इतर सर्व स्थानके उन्नत असतील. भविष्यात ही लाईन वाधवनपर्यंत, वाढवली जाऊ शकते अशी चर्चा आहे. जे एक नवीन खोल समुद्री बंदर असणार आहे.


बुलेट ट्रेनची पहिली चाचणी

हा प्रकल्प आता चाचणीकडे वाटचाल करत आहे. पहिली चाचणी 2026 मध्ये नियोजित आहे, जी सुरत ते बिलोमोरा दरम्यान सुमारे 50 किमी अंतरावर आयोजित केली जाईल. हा प्रदेश भारतातील सर्वात जास्त गर्दी असलेल्या, रेल्वे मार्गापैकी एक आहे आणि येथे बुलेट ट्रेन सुरू झाल्यामुळे जलद, स्वच्छ आणि वेळेवर प्रवास करण्यासाठी एक नवीन पर्याय उपलब्ध होईल. या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाचा अंदाजे खर्च 1.1 लाख कोटी रुपये आहे. हा प्रकल्प केवळ हाय- स्पीड वाहतूक सेवा प्रदान करणार नाही पर्यावरण संतुलन राखण्यासाठी सौर उर्जा आणि पावसाच्या पाण्याचे संचयन यासारख्या तंत्रज्ञानाचा देखील वापर करेल. यामुळे कार आणि हवाई प्रवासावरील अवलंबित्व कमी होईल, ज्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि वाहतूक कोंडी कमी होईल.


रोजगाराच्या संधी आणि विकासाला चालना

ही ट्रेन केवळ वाहतूकीचे जलद साधन राहणार नाही, तर हजारो रोजगाराच्या संधी निर्माण करेल, स्थानिक व्यवसायांना चालना मिळणार आहे. स्टेशन परिसरात विकासाची एक नवी लाट आणेल. प्रत्येक स्टेशनला स्मार्ट झोन म्हणून विकसित करण्याची योजना आहे, ज्याचा फायदा शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांना होईल. महाराष्ट्रात भूसंपादन आणि प्रशासकीय विलंबामुळे प्रकल्पाची प्रगती काही काळ मंदावली असली तरी, अलिकडच्या अहवालांवरुन असे दिसून येते की, या समस्या आता जवळजवळ सुटल्या आहेत.


गुजरातमध्ये बांधकामाचे काम खूपच प्रगतीपथावर आहे आणि महाराष्ट्रातही ते आता वेगाने प्रगती करत आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार आता एकत्र काम करत आहेत. मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हे भारताच्या भविष्याकडे एक मजबूत आणि धाडसी पाऊल आहे. या प्रकल्पामुळे देशाच्या वाहतूक पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण तर होईलच, शिवाय भारताची जागतिक प्रतिमाही नवीन उंचीवर जाईल बुलेट ट्रेनच्या आगमनाने, भारत जगाच्या हाय-स्पीड रेल्वे नकाशावर स्वत:चे स्थान निश्चित करेल.

Comments


bottom of page