top of page

ब्राम्हण म्हणून फडणवीस टार्गेट;




मंत्री बोर्डीकर यांचा मराठवाड्यातील जातीच्या राजकारणावर घणाघात

भाजपच्या मंत्री मेघणा बोर्डीकर यांनी मराठवाड्याच्या जाती-पातीच्या राजकारणांवर घणाघात केला आहे. विशेष करुन देवेंद्र फडणवीस यांना ब्राम्हण जातीवर करण्यात आलेल्या टार्गेटवरुन त्यांनी मराठवाड्यातील नेत्यांवर आगपाखड केली आहे. “ संविधान बदलणार, मुस्लिमांना देशाच्या बाहेर काढणार, नागरिकत्व धोक्यात येणार, असे खालच्या पातळीवरचे घाणेरडे राजकारण करुण फडणवीस यांना जातीवरुन जसे नावे ठेवली, माझ्या बाबत देखील झाले,” असा घणाघात मंत्री मेघणा बोर्डीकर यांनी केला.


भाजप मंत्री मेघणा बोर्डीक़र बीड जिल्हा दौर्‍यावर असताना त्यांनी माजलगांव येथील कार्यक्रमास हजेरी लावली. मराठवाड्यातील जाती-पातीच्या राजकारणावरुन त्यांनी जोरदार टिका केली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार प्रकाश सोळंके यावेळी उपस्थित होते. मेघणा बोर्डीकर यांनी निवडणूकीच्या वेळेस आणि त्या आगोदर देवेंद्र फडणवीस यांना ब्राम्हण समाजाचे म्हणून नावे ठेवली गेली.


त्याच बरोबर सतत जाती-पातीचे राजकारण चालू ठेवले. अनुसूचित जातींच्या लोकांना संविधान बदलणार, मुस्लिमांना देशाबाहेर काढणार, नागरिकत्व धोक्यात येणार, अशी भिती दाखवत मराठवाड्यात अत्यंत जाती-पातीचे घाणेरडे राजकारण खेळले गेले. काही मंडळींनी ब्राम्हण समाजाचे देवेंद्र फडणवीस म्हणून त्यांना वेगवेगळ्या प्रकारे नांव ठेवली. तसंच माझ्या बाबतीत देखील असंच झाल्याचे त्या म्हणाल्या.


मेघणा बोर्डीकर या आरोग्यमंत्री आहेत यावेळी त्यांनी राज्यात प्रत्येक भागात गावाच्या पाच ते दहा किलोमिटर अंतरावर अरोग्य यंत्रणेचं जाळं पसरवणार असल्याचे सांगितले. नागरिकांना आरोग्याच्या सुविधां मिळाल्या पाहिजेत. स्त्रीयांसाठी वेगळे रुग्णालंय उभारणार असल्याचे सांगितले. डायलिसीससाठी सुद्धा प्रत्येक रुग्णालयात सुविधा चालू करणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात एक कँन्सर हॉस्पीटल उभं करणार असल्याची मोठी घोषणा मंत्री मेघणा बोर्डीकर यांनी यावेळी केली.



मागेल त्याला सौरपंप योजना सुरू केली आहे त्यामुळे प्रत्येक शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. निजाम कालिन शाळा इमरती तोडून नविन शाळा इमारती बांधणार आहोत. मराठवाड्यातील जिल्हा परिषदेची शाळा दर्जेदार हव्यात यासाठी हे काम हाती घेतलं आहे. यासाठी आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील पुढाकार घेऊन, भाजप कार्यकर्त्यांनी देखील समन्वय साधुन हे काम मार्गी लावावं, असं अवाहन मंत्री बोर्डीकर यांनी केले.

Comments


bottom of page