भंडार्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर नोकरी लाटणार्या महसूलचे 3 अधिकारी,कर्मचारी बडतर्फ; 3 अधिकार्यांचे निलंबन
- Navnath Yewale
- Mar 23
- 1 min read

भंडारा: दिव्यांगांचा बोगस प्रमाणपत्र तयार करून त्यावर शासकीय नोकरी लाटणार्या महसूल विभागातील सात अधिकारी आणि कर्मचार्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनं भंडारा जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भंडारा जिल्ह्यातील विविध विभागात दिव्यांगांच्या बोगस प्रमाणपत्राच्या अधारावर शासकीय नोकरी बळकाविणार्यांची विशेष समितीच्या मूाध्यमातून चौकशी करण्यात आली.
महसूल विभागातील सात कर्मचारी यात दोषी आढून आल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये भंडार्याचे नायब तहसीलदार आनंद हट्टेवार, तीन तलाठी, एक मंडळअधिकारी, दोन सहाय्यक महसूल अधिकारी यांचा समावेश आहे. भंडारा येथील नायब तहसीलदार आनंद हट्टेवार यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावं, असा प्रस्ताव जिल्हा निवड समितीच्या वतीनं शासनाकडे पाठवण्यात आला आहे. प्रशासकीय स्तरावर एवढ्या वरिष्ठ पदाच्या अधिकार्यावर अशी प्रकारची कारवाई झाल्यानं महसूल विभागात चांगलीच चर्चा रंगली आहे.
बडतर्फ अधिकारी, कर्मचारी : वसुंधरा वासनिक -इंगळे (मंडळ अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा -पुनर्वसन शाखा), शारदा सूर्यभान झंझाड -तलाठी (मोहाडी), विनोद भावे तलाठी (मोहाडी)
निलंबित अधिकारी, कर्मचारी : शिवशंकर साखरवाडे -सहाय्यक महसूल अधिकारी, योगराज बाबूराव डांगरे-तलाठी (लाखनी), दिलीपसिंग भरतसिंग ठाकूर - सहाय्यक महसूल अधिकारी (पवनी)



Comments