top of page

भगतसिंह कोश्यारी लफंगा माणूस, त्याला नीट धोतर नेसता येतं का? - खासदार संजय राऊत ,राज्याचे माजी राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्या राज ठाकरेंवरील उपरोधक टीकेवर राऊतांकडून जहरी पलटवार

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर भाषिक मुद्यावरुन टीका केली होती. रटाळ प्रवचनाच्या राजकीय टीका दिप्पणी करू नका, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. यावर महराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पलटवार केला होता. जी लोक कार्यक्रमाला आली ती सर्व लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरली नसतील. पण, राज ठाकरे हे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले आहेत, अशी उपरोधक टीका कोेश्यारी यांनी केली. आता शिवसेना ठकारे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.


संंजय राऊत म्हणाले की, त्याला नीट धोतर नेसता येत नाही, तो काय आम्हाला अक्कल शिकवतोय, जो स्वत: धोतर नीट नेसू शकत नाही, तो ठाकरेंना सांगतोय की मोदींना घाबरू नका. मोदींना कोण घाबरतंय? काल राहुल गांधींनी सांगितलं नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यात डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिंमत नाही. गांधीचे भाषण सुरू असताना पंतप्रधान आणि अमित शाह यांनी संसदेतून पलायन केले आणि हे आम्हाला सांगत आहेत. तुमच्या हातात सत्ता आणि एजन्सी आहे म्हणून तुम्ही आम्हाला सांगत आहात.


पहिले नीट धोतर नेसायला शिका आणि मग इथे महाराष्ट्रात येऊन आम्हाला अक्कल शिकवा. हा एक नंबरचा लफंगा माणूस आहे. त्याला पद्मभूषण दिलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्म फुले यांचा अपमान करणारा हा माणूस आहे. त्याला भारतीय जनता पक्षाने पद्मभूषण देले. हा बाळासाहेब ठाकरे यांचा विचार नाही मिस्टर फडणवीस हे लक्षात घ्या. त्याला पद्मभूषण देणार्‍यांना बाळासाहेब ठाकरेंनी जोड्याने मारले असते. अशी टीका त्यांनी केली.

Comments


bottom of page