
कालच झालेल्या हरियाणातील निवडणुकीत भाजपने नेत्रदीपक विजय मिळविला. ९० संख्येच्या विधानसभेत भाजपने ४८ पर्यंत जागा मिळविल्या. तर प्रतिस्पर्धी काँग्रेस ने ३७ जगावर समाधान मानले. आपला एकही जागा मिळाली नाही तर लोकदलाला तीन जागा मिळाल्या दोन अपक्ष निवडून आले निवडणुकीच्या अगोदर भाजपा विजयी होईल असे अनेकांना वाटत नव्हते . इतकेच काय सर्व एक्झिट पोल नी भाजपाला सत्ता मिळणार नाही असे भाकीत वर्तविले होते. सकाळी निवडणुकीचे निकाल जाहीर होताच काँग्रेस ने मुसंडी मारली . पण काही वेळातच भाजपने जोरदार कम बॅक करत विजयाला गवसणी घातली. या वेळी भाजपाला बंडखोरीची बरीच लागण झाली होती. तथापि त्यांना निवडणुकीत फारसे मतदारांनी जवळ केले नाही. भाजपने उत्तरा खंड मध्ये नेतृत्वाचा बदल केला होता त्याचे चांगले परिणाम त्यावेळी दिसून आले होते . हाच प्रयोग भाजपने हरियाणात केला . हरियाणात भाजपने लोकसभेच्या वेळी मुख्यमंत्री बदलले खट्टर यांच्या ऐवजी सैनी यांना मुख्यमंत्री म्हणून संधी दिली त्याचा चांगला परिणाम मतदारावर झाला.
हरियाणात दोन शेतकरी आंदोलने झाली त्याचा फारसा परिणाम झाला नाही शेतकरी संघटनेचे एक नेते यांना केवळ ११७० मते मिळाली . यावेळी जाट मतदार विरोधी जातील असे चित्र उभे होते . पण त्याचा फारसा विरोध झाला नाही. काँग्रेस ने त्यांच्या काळात दिलेल्या नोकऱ्या व भाजपने त्यांच्या काळात दिलेल्या नोकऱ्या जास्त होत्या त्याचा सकारात्मक परिणाम झाला . या शिवाय मोदी फॅक्टर कामास आला . मोदी शहा नड्डा यांनी अनेक सभा व रोड शो घेतले व प्रचार पिंजून काढला. या शिवाय या निवडणुकीत आप व काँग्रेस यांची आघाडी होऊ शकली नाही. त्याचा परिणाम मतविभागणी त झाला. वास्तविक भाजपाला काँग्रेस पेक्षा केवळ ० .८५ टक्के जास्त मते मिळालेली आहेत पण त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या तब्बल ११ जागा पडल्या.
गेली सुमारे तीन टर्म्स भाजपा सत्तेत आहे . त्यामुळे प्रस्थापित सरकारविरुद्ध जनतेचा मनात रोष होता त्याचा परिणाम होईल कि काय अशी शंका होती पण त्याचा परिणाम दिसून आला नाही. हरियाणात दिनेश फोगट ही ओलीम्पिअन कुस्तीपटू निवड णुकीच्या रिंगणात होती तिचा विजय झाला पण इतर उमेदवारावर त्याचा परिणाम झाला नाही. २०१९ च्या निडणुकीत भाजपाला ४०सीट्स मिळाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी काही अपक्ष व जेजेपी यांच्या मदतीवर सरकार चालविले होते. यावेळी त्यांना निर्विवाद बहुमत मिळाले २०१४ नंतर प्रथमतः भाजपने बहुमत स्वतःच्या बळावर मिळविले. यावेळी मागासवर्गीय मतदारानी काँग्रेस कडे पाठ फिरविली असे दिसते .काँग्रेस ने भूपेंद्र सिंग हुड्डा यांना पुढे केले पण कुमारी शैलजा यांची नाराजी होती . भाजपने त्यांच्यावर काँग्रेस मध्ये कसा अन्याय होत आहे हे प्रचारात सांगितले त्याचा फायदा भाजपाला झाला. यावेळी भाजपने चार मंत्रासोबत १४ आमदारांचे तिकीट कापले . अनेक नवीन उमेदवार दिले एकूण २३ नवीन उमेदवार दिले काँग्रेस ने अग्निपथ योजनेवर टीका करत प्रचार केला. या उलट भाजपाने. आपली रणनीती बदलली. कॉन्रेस ने शेतकरी, बेकारी व जातीयवाद अशा अनेक मुद्दयावरून प्रचारात रान उठविले पण मतात त्याचा परिणाम झाला नाही अनेक छोट्या पक्षांनी मते खाल्ली. यावेळी मायावतींनी जादूही दिसली नाही. काँग्रेस मधील गटबाजी, हवेतला प्रचार व विधानसभा निवडणुका वेगळेपण लक्षात घेण्यात आलेले अपयश ही काँग्रेस च्या पराजयाची करणे असू शकतात. त्यांनी निवडणूक आत्मविश्वास पूर्वक लढविली नाही. लोकसभा निवडणुकीतील यशामुळे काँग्रेस हवेतच होती या उलट भाजपने विचार पूर्वक लक्ष दिले .हरियाणातील भाजपच्या विजया मुळे आता यावर्षी होणाऱ्या महाराष्ट्र व झरखड तसेच पुढील वर्षी होणाऱ्या दिल्ली येथील निवडणुकीत भाजपाला मोठा आत्मविश्वास प्राप्त झाला आहे . त्याचा परिणाम त्यांच्या जागा वाढण्यावर निश्चितच होईल .
- शांताराम वाघ, पुणे
Comments