भाजपनेत्या मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लिल मॅसेज पाठवले, परळीच्या तरुणाला पुण्यातून अटक
- Navnath Yewale
- May 2
- 2 min read

मंत्री पंकजा मुंडे यांना वारंवार अश्लिल मॅसेज पाठवणे, सतत फोन कॉल करून त्रास दिल्याच्या आरोपखाली पुण्यातून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. अमोल काळे असे तरुणाचे नाव आहे . अमोल काळे याने असं कृत्य करण्यामागच्या कारणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. आरोपीला पोलिसांनी आज कोर्टात हजर केले असता त्यास मा. न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
महाराष्ट्र सायबर पोलिसांनी पुण्यातील भोसरी येथून अमोल काळे वय 25 वर्षे यास बेड्या ठोकल्या आहेत. भाजपा नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लिल कॉल आणि मेसेज पाठवल्याच्या आरोपखाली त्याच्या मुसक्या आवळल्या. पंकजा मुंडे यांना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने त्रासदायक कॉल आणि आक्षेपार्ह मेसेज अमोल काळे याच्याकडून येत होते. या प्रकरणी भाजपाच्या महाराष्ट्र कार्यालयातील सोशल मिडीया समन्वयक निखील भामरे (वय 26) यांनी मुंबईतील नरिमन पॉइंट येथे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी या प्रकरणी ही कारवाई केली.
निखील भामरे यांच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी या प्रकणाचा तपास केला. याचे धागेदोरे पुण्यात असल्याचे समोर आले. सायबर पोलिसांनी आरेापी अमोल काळे याला पुण्यातील भोसरी येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काळे याने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याच्याविरुद्ध भांदवि कलम 78 आणि 79 तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधीत तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मा. न्यायालयाच्या आदेशाने आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहे.
25 वर्षीय अमोल काळे हा बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवासी आहे. अमोल सध्या पुण्यात राहून शिक्षण घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने कॉज आणि मेसेजमध्ये अश्लिल भाषा वापरली होती. अमोल काळे यांच्या फोनवरील संभाषणामुळे पंकजा मुंडे यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. काळे याने आपला गुन्हा कबूल केला आहे.
पोलिस सूत्रांनुसार, काहे याच्या या कृत्यामागील हेतू वैयक्तिक रागातून प्ररित होता. की अन्य कोणत्या कारणामुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आरोपीच्या हेतूंसह इतर कोणाचा सहभाग आहे का, याचीही चौेकशी करत आहेत.
Comments