top of page

भाजप आमदारच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; एक ठार

ree

भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीने अहिल्यानगर ते पुणे मार्गावर कारेगाव फाट्यानजीक दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरील एक जण जाग्यावर ठार झाला. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आष्टी, पाटोदा, शिरुर मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश धस यांचे चिरंजीव सागर सुरेश धस यांच्या चार चाकी वाहनाने सुप्पा (ता. पारनेर) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अहिल्यानगर - पुणे मार्गावर कारेगाव फाटा येथे एका दुचाकीस पाठीमागून धडक दिल्याची माहिती आहे. या अपघातात नितीन शेळके (उद्योगपती) जागीच ठार झाले.


दरम्यान, सागर धस आणि सचिन कोकणे हे सागर धस यांच्या चारचाकी वाहनाने आष्टीवरून पुण्याच्या दिशेने जात होते. रात्री 10:30 च्या सुमारास आहिल्यानगर- पुणे महामार्गावर कारेगाव फाटा येथे सागर सुरेश धस यांच्या वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये नितीन शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती कळताच सुप्पा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून सुप्पा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुप्पा पोलिस करत आहेत.

Comments


bottom of page