भाजप म्हणजे विषारी नाग!, बच्चु कडूंच्या धक्कादाय दाव्यांनी खळबळ अजितदादांच्या मृत्यूबाबत अनेक संशय?; भाजपसोबत दोस्ती ही नको आणि दुश्मनीही नको, पण आम्ही दुश्मनी पत्कारली
- Navnath Yewale
- Feb 14
- 2 min read

अमरावती: राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादांच्या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहेत. दुर्घटनेचा सीआयडीसह केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत तपास सुरू आहे. आमदार अमोल मिटकरी, आमदार रोहित पवार यांच्यानंतर आता बच्चू कडूंंनीही धक्कादायक दावे करत संशय व्यक्त केल्याने खळबह उडाली आहे.
बारामती विमानतळावर 28 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. लँडिंगदरम्यान झालेल्या या भीषण अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजितदादांच्या अपघाती मृत्यूबाबात प्रथम आमदार आमोल मिटकरी यांनी शंका उपस्थित करत अपघात की घातपात यावर चौकशीची मागणी केली.
अजितदादांच्या तेरवी विधीनंतर आमदार रोहित पवार यांनी थेट सादरीकरणाद्वारे पत्रकार परिषदेतून घातपाताचा दावा केला. दिल्लीमध्ये आयोजीत पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी अजित दादांनी शेकडो कोटींचे कंत्राट, राईसमिलच्या फाईलींवर सह्यांसाठी ठरवून उशिर करण्यात आला. ज्यामुळे बायकार बारमतीचा दौरा रद्द करून ऐनवेळी अजितदादांना विमान बुक करावे लागल्याचा दावा करत आंतरराष्ट्रीय त्रयस्त यंत्रणेकडून तपासाची मागणी केली.
अजितदादांचा अपघात की घातपात हे गुड कायम असतानाच आता प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी धक्कादायक दावे करत थेट भाजपकडेच बोट दाखवल्याने खळबळ उडाली आहे. माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले की, साधी एसटी बस डेपोत जागा असेल तरच (पार्क) लावतो. साधी गोष्ट आहे ते विमान आहे हजार टक्के जोपर्यंत लँडिंगस्थिती येत नाही तोपर्यंत लँड करता येतच नाही या सर्व गायईडलाइनच आहेत. मुळात विमानच वैमानिकाला कार्यक्रम देत असतं जर इथ उतरलं जात नसलं तर दुसरं एअरपोर्ट देत ते लगेच, आर्धा तासाचं अतर होतं पुण्याचं लगेच का बरं दिलं नाही प्रश्नचिन्ह आहे. का बरं एवढी जोखीम त्या पायलटनं कशी घेतली, सबंधीत अधिकार्यानं कशी घेतली. अजितदादा उपमुख्यमंत्री असताना असे अपघात होतात, तर यंत्रणा किती किळस झालेल्या आहेत. आणि हा किळसवाना प्रकार आहे. अजितदादांच्या विमान अपघाताचे अनेक संशय असल्याचंही बच्चू कडू म्हणाले.
पुढे बोलताना बच्चू कडून म्हणाले की,माझं तर मत आहे का भाजप म्हटलं का आता संशयानेच पहातं. म्हणजे त्यांनी खांद्यावर हात टाकला की लोकं म्हणतात हा मेला, त्यांच्या खांद्यावर आपण हात टाकला तरी लोक म्हणतात.. ते सापा सारखे लोक आहेत. विषारी नाग आहे भाजप म्हणजे, त्यामुळे भाजपसोबत दोस्ती नाही आणि दुश्मनी ही नाही, आम्ही तर दुश्मनी करुन बसलोत. त्यामुळं ते कधीही नाग पाठवू शकतात आमच्याकडे अशी भीती व्यक्त करत बच्चू कडूंनी भाजपवर निशाना साधला.
अजितदादांनी नुकताच पाणी पिण्यासाठी प्लॅस्टीक बॉटलचा वापर बंद करून काचेच्या बॉटलचा वापर सुरू केला होता यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की प्लॅस्टीक बॉटलमध्ये चँसेस (विषप्रयोग) अधिक असतात, काचेच्या बॉटलमध्ये ते कमी होतात म्हणजेच संभ्रम असेल त्यांना कुठे ना कुठे. आणि मुळात अजित दादा म्हटले होते की माझ्या जवळ पण फाईल आहे. अजित दादांची फाईल भाजपकडे होती, अजितदादांच्या लक्षात आलं का तर भाजपवाले फाईल ठेवू शकतात तर आपनही फाइल ठेवू शकतो. जर अजितदादांची फाईल भाजपला भारी पडत असेल तर हे किंतू परंतू पुन्हा निर्माण होत असल्याचा संशयही बच्चू कडून यांनी व्यक्त केला.
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणारवर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, विलिनिकरणाचा विषय हा त्या दोन्ही राष्ट्रवादी पक्षातीमधील अंतर्गत विषय आहे. आम्ही काय बोलणार आहेत त्यावर आमचा पक्ष छोटा, आम्ही कार्याने मोठे आहोत पण राजकीय दृष्ट्या लहान असल्याचंही माजी मंत्री बच्चू कडू म्हणाले.



Comments