भारताकडून हल्ल्याची भीती; पाकच्या लष्करप्रमुखांनी काढला पळ! भारत-पाक तणाव शिगेला, युद्धाचे सावट
- Navnath Yewale
- May 1
- 2 min read

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून सीमाभागात लष्करी कारवाईसाठीची तयारी करत सैन्यदलांना सज्ज करण्यात आलं आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव शिगेला असतानाच आता पाकिस्तानमध्ये मोठी उलथापालथ झाल्याचं पहावयास मिळत आहे. भारताकडून कोणत्याही क्षणी हल्ला होण्याच्या भितीनं पाकिस्तानचा थरकाप उडत असतानच तिथं पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी काढल्याचं वृत्त समोर आलं आहे.
भारत पाकिस्तान मध्ये तणावाची परिस्थिती वाढली असून आता लष्कर आणि देशातील सरकारमध्येच मतभेद असल्यानं आता पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आयएसआय या देशातील गुप्तच यंत्रणेच्या प्रमुखांना एनएसएच्या पदी नियुक्त केल्याचं समोर येत आहे.
पाकिस्तानात बंडखोरी आणि इतर कैक आव्हानांचा सामना सरकारला करावा लागत असल्याची वस्तूस्थिती आहे. तर भारतात पहलगाम दशहतवादी हल्ल्यावरुन दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायाल करणार असून आता पाकचं समर्थन असणार्या या भ्याड हल्ल्यांच उत्तर भारत नेमका कसा देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
जनरल असिम मुनीर नेमके गेले तरी कुठे?
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर सध्या त्यांच्याच देशात अनेक अडचणींचा समाना करताना दिसत असून त्यांनी पलायन केल्यानं पाक सरकारनं गुरुवारी रात्री उशीरा आयएसआय प्रमुख लेप्टनंट जनरल मुहम्मद असीम मलिक यांना पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदी नियुक्त केलं. पहलगाम हल्ल्यानंतर आता पाकच्या मुनीर यांनी नेमका देशच सोडला का? हा प्रश्न सर्वच स्तरांतून उपस्थित केला जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार भारताकडून कठोर कारवाईच्या दृष्टीनं पावलं उचचली जात असली तरीही मुनीर मात्र कोणतीही प्रत्यूत्तराची कृती करताना दिसत नाहीत. त्यामुळं एकतर त्यांनी देश सोडला असावा किंवा रावळपिंडीतील एखाद्या बंकरमध्ये त्यांनी आसरा घेतला असावा असा कयास लावला जात आहे. पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांचा कुठेही पत्ता लागत नसल्याची बाब सोशल मिडियावर वार्याच्या वेगानं पसरली आणि इथं ‘हॅस मुनिर आऊट’ हा हॅशटॅग ट्रेंड करू लागला.
पाकिस्तान सरकारच्या कानांवर जेव्हा ही बातमी पडली तेव्हा त्यांनी तातडीनं या गोंधळात सारवासारव करण्याच्या हेतूनं एक पोस्ट करत 26 एप्रिल रोजी पाकच्या पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मुनीर सहभागी झाल्यााचा एक फोटो प्रसिद्ध केला. पण, तरीही मुनीर यांचा कुठेही थांगपत्ता नसल्यानं आता देशाच्या संरक्षणाची धुरा आयएसआय प्रमुखांवर सोपवण्यात आल्याचं वृत्त समोर आहे.
Comentarios