भारताचा मोठा निर्णय; पाकिस्तानी युट्यूब चॅनल ब्लॉक

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, प्रक्षोभक आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील सामग्री पसरवल्या बद्दल भारत सरकारने पाकिस्तानी युट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत. सरकारनी सूत्रांनुसार, पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सचे एकून 6.3 कोटी सबस्क्रायबर होते यामध्ये 16 चॅनेल्सचा समावेश आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारशीवरुन या 16 युुट्यूब चॅनेल्सवर ही कारवाई करण्यात आली आहे.
हे चॅनल्स केले ब्लॉक
ब्लॉक केलेल्या चॅनेलमध्ये पाकिस्तानी न्यूज चॅनल डॉन, समा टिव्ही, एआरवाय न्यूज, बोल न्यूज, रफ्तार, जिओ न्यूज अणि सुनो न्यूज यांचा समावेश आहे. तसेच पत्रकार इर्शाद भट्टी, आस्मा शिराजी, उमर चीमा आणि मुनीब फारूख यांच्या युट्यूब चॅनेलवरही बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, द पाकिस्तान रेफरन्स, समा स्पोर्ट्स, उजैर क्रिकेट आणि रझी नामा सारखे इतर प्लॅटफॉर्म देखील या यादीत आहेत.
भारत- पाकिस्तान संबंध अधिक तणापूवर्ण
सरकारी सूत्रांनुसार, हे युट्यूब चॅनेल भारत, भारतीय सैन्य आणि सुरक्षा संस्थांविरुद्ध खोटा, दिशाभूल करणारा आणि उत्तेजक प्रचार करत होते, विशेषत: पहलगाम हल्ल्यानंतर, जेव्हा भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिक तणावपूर्ण बनले होते. या हल्ल्यात 25 पर्यटक आणि एका काश्मीरी नागरिकाची निर्घुण हत्या करण्यात आली.
आता जर कोणी या चॅनेल्समध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना ‘राष्ट्रीय सुरक्षेशी’ किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित सरकारी आदेशांमुळे ही सामग्री या देशात उपलब्ध नाही. अधिक माहितीसाठी गुगल ट्रान्सपरन्सी रिपोर्ट पहा’ असा संदेश दिसेल.
भारताने पाकिस्तानविरुद्ध उचलली कठोर पावले.
पहलगाम हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे. भारताने सिंधू जल करार आणि पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा देखील स्थगित केली आहे. प्रत्यूत्तरादाखल, पाकिस्तानने म्हटले आहे की, शिमला करारासह भारतासोबतचे सर्व द्विपक्षीय करार स्थगित करण्याचा अधिकार त्यांना आहे.
दरम्यान, या हल्ल्यात सहभागी असलेल्यांना आणि त्यांच्या आश्रयदात्यांना अशी शिक्षा दिली जाईल की, ज्याची त्यांनी कल्पनाही केली नसेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी देशवासीयांना वचन दिले की, प्रत्येक दहशतवादी आणि त्याचे सहाय्यक शोधले जातील, पकडले जातील आणि त्यांना शिक्षा केली जाईल.



Comments