भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तान संतप्त; भारतीय राजदुतास देश सोडण्याचे आदेश
- Navnath Yewale
- May 14
- 1 min read

भारताच्या कारवाईमुळे अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने इस्लाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातील एका कर्मचार्याला ‘ पर्सोना नॉन ग्राटा’ म्हणून घोषित केले आहे. पाकिस्तानने आरोप केला आहे की, संबंधित अधिकारी त्यांच्या अधकिृत दर्जानुसार कामात गुंतलेले नव्हते भारत सरकारने नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील एका अधिकार्याला ‘पर्सोना नॉन ग्राटा’ म्हणून घोषित केले होते.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, पाकिस्तान सरकारने इस्लामाबादामधील भारतीय उच्चायुक्तलयातील एका कर्मचार्याला त्याच्या विशेषाधिकाराच्या विरुद्ध असलेल्या कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल ‘ पर्सोना नॉन ग्राटा’ म्हणून घोषित केले आहे. संबंधित अधिकार्याला 24 तासांच्या आत पाकिस्तान सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भारतीय कार्यवाहक उच्चायुक्तांना परराष्ट्र मंत्रालयात बोलवण्यात आले आणि या निर्णयाबाबत त्यांना एक आक्षेप पत्र देण्यात आले.
मंगळवारी भारत सरकारने घेतलेल्या अशाच एका निर्णयानंतर पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे. भारताने नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात काम करणार्या एका पाकिस्तानी अधिकार्याला ‘ पर्सोना नॉन ग्राटा’ म्हणून घोषित केले होते. भारत सरकारने आरोप केला होता की, सदर अधिकारी ज्यांच्या राजनैतिक दर्जाशी जुळणार्या नसलेल्या कारवायांमध्ये सहीभागी होता.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ‘ भारत सरकारने नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात काम करणार्या एका पाकिस्तानी अधिकार्याला ‘पर्सोना नॉन ग्राट’ म्हणून घोषित केले आहे, कारण तो अशा कारवायांमध्ये सहभागी होता, ज्या त्यांच्या अधिकृत दर्जानुसार नव्हत्या.’
तणाव शिगेला : दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर कारवाई केल्यानंतर, पाकिस्तान मागे पडला आहे आणि विचित्र निर्णय घेत आहे. या राजनैतिक पावलाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, भारत- पाकिस्तान संबंध किती संवेदनशील आणि तणापूर्ण आहेत.
Comentários