भारताच्या हवाई हल्ल्याच्या भितीने पाकिस्तानचा अमेरिकेला फोन
- Navnath Yewale
- May 12
- 1 min read

भारत- पाकिस्तान संघर्षाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. भारताच्या हवाई हल्ल्यांमुळे पाकिस्तान इतका घाबरला होता की, त्याने अमेरिकेला फोनही केला. माहितीनुसार, पाकिस्तानने अमेरिकेला सांगितले की, भारत आमच्या अणुकेंद्रावर ब्रम्होस क्षेपणास्त्राने हल्ला करेल. त्यामुळे भीतीपोटी पाकिस्तानने अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाला युद्धबंदीसाठी आवाहन केले.
युद्धबंदीची थेट चर्चा !
यानंतर, अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मार्को रुबियो यांनी युद्धबंदीच्या मुद्यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर भारताने युद्धबंदीला सहमती देण्यास स्पष्ट नकार दिला. भारताने अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मार्को रुबीयो यांना सांगितले की, हा दोन्ही देशांमधील विषय आहे. पाकिस्तानने स्वत: पुढे येऊन युद्धबंदीबद्दल बोलले पाहिजे. त्यानंतर पाकिस्तानचे डीजीएमओ आणि भारताचे डीजीएमओ राजीव घई यांच्यात चर्चाझाली आणि शनिवारी (10 मे) युद्धबंदीची घोषणा करण्यात आली.
दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये चर्चा
सोमवारी संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स (डीजीएमओ) महासंचालक याच्यात युद्धबंदीबाबत चर्चा झाली. ही चर्चा भारताचे डीजीएमओ राजीव घई आणि पाकिस्तानचे डीजीएमओ काशिफ अब्दुल्ला चौधरी यांच्यात झाली. यामध्ये भारताने स्पष्टपणे म्हटले आहे की, दहशतवाद संपवण्यासाठी नवीन धोरण तयार करण्यात आले आहे. आता आम्ही सीमेवर दहशतवादी कारवाया खपवून घेणार नाहीत, त्यांचा खात्मा करू . शिवाय दहशतवादी कारवाई युद्धसमजले जाईल अशा अटींवर युद्धबंदीची घोषणा करण्यात आली.
Comments