भारतात इबोला व्हायरसची एंट्री? युगांडाहून परतलेले दोन प्रवासी क्वारंटाईन
- Navnath Yewale
- May 28
- 1 min read

आफ्रिकेतील इबोलाच्या वाढत्या संकटाला पाहता डब्ल्यूएचओने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. त्यानंतर भारत सरकार अॅक्शन मोडमध्ये आहे. पण भारतासह महाष्ट्रात इबोला व्हायरसची एंट्री झाली काी काय अशी भीती निर्माण झाली आहे. नागपूर विमानतळावर युगांडावरून एक प्रवासी परतला आहे. त्यामुळे इबोलाच्या धोक्याने नागपूर विमानतळ हायअलर्टवर आहे. या 47 वर्षीय प्रवाशावर आरोग्य विभागाची नजर असून सध्या तरी त्याच्यामध्ये इबोलाचे कोणतेही लक्षणं दिसत नाहीत. पण सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून त्याला पुढील 21 दिवस होम आयसोलेशन करण्यात आलं आहे. तसंच राजे आरोग्य विभागाकडून त्याची काळजी घेतली जाणार आहे. भविष्यात जर त्या प्रवाशांमध्ये लक्षणं आढळल्यास रुग्णणालयात दाखल करण्यात येईल, असंं सांगण्यात आलं आहे.
त्याबरोबर युगांडामधून एक 28 वर्षीय तरुणी बंगळुरुच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली आहे. ती 23 मे रोजी बंगळुरुला आली होती. तिलादेखील इंदिरानगर येथील साथरोग रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आल्याचं पीटीआयने सांगितलं आहे. अरोग्य विभागाचे प्रधान सचिव ऋत्विक रंजनम पांडे यांनी या तरुणीबद्दल सांगितलं की, तिच्यामध्ये सध्या तरी इबोलाची कोणतीही लक्षणं नाहीत. पण तिला थकवा जाणवत असल्याने विमानतळ प्राधिकरणाने तिचे रक्ताचे नमुने गोळा केले आहेत. हे नमुने तपासणीसाठी पुण्यातील रष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेला पाठवण्यात आले आहेत.
इबोलाची लक्षणं : अचानक तीव्र ताप, प्रचंड अशक्तपणा, तीव्र डोकेदुखी, स्नायू दुखणे, उलट्या, जुलाब, डोळे लाल होणे, भूक न लागणे
दरम्यान, केंद्र सरकारने इबोला व्हायरसला परिस्थितीवर आपली करडी नजर असल्याचे सांगितलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. खबरदारी म्हणून भारतातील विमानतळावर आणि इतर प्रवेशद्वारावर प्रवाशांचे स्क्रीनिंग सुरू करण्यात आले आहे. आफ्रिकण देशांमध्ये इबोला व्हायरसचा संसर्ग वेगाने वाढत असून सर्वाधिक प्रकरणे काँगोमध्ये आढळून आली आहेत. काँगोमध्ये आतापर्यंत इबोलाचे 101 पॉझिटिव्ह रुग्ण आणि 900 हून अधिक संशयित रुग्णांची नोंद झाली आहे.



Comments