top of page

भारतात कुठेच नाही ते चौथ्या मुंबईत असेल; नव्या मुंबईला पर्याय तिसरी मुंबई उभारण्यात येत आहे - मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईला पर्याय म्हणून तिसरी मुंबई उभारली जात आहे. नवी मुंबईच्या पुढे चिरनेर जवळ तिसरी मुंबई उभारली जात आहे. तिसरी मुंबई उभारण्याच्या अनुषंगाने जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया लवकर सुरू करण्याच्या अनुषंगाने तयारी सुरु आहे. तिसरी मुंबई निर्माण करण्याच्या अनुषंगाने प्रत्यक्षात कार्यवाही सुरू झाली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौथ्या मुंबईची घोषणा केली आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौथी मुंबई कुठे असेल याबाबत विधानसभेत माहिती दिली. मुंबई आणि नवी मुंबई काय भारतात कुठेच नाही ते चौथ्या मुंबईत असेल. मुंबई नवी मुंबई आणि तिसर्‍या मुंबईपेक्षा सुपर कनेक्टिव्हीटी असणारे शहर ठरणार आहे. वसई, विरारपासून पुढे पालघरकडे चौथी मुंबई निर्माण केली जाणार आहे. भारतातील पहिले ऑफशोर अर्थात समुद्रावर तरंगणारे पहिले विमानतळ या चौथ्या मुंबईत असणार आहे. पालघरच्या कोरे समुद्रावर उभारले जाणारे हे ऑफशोर विमानतळ महाराष्ट्रातील तिसरे विमानतळ असणार आहे. महाराष्ट्रातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प देखील चौथ्या मुंबईतून जाणार आहे. कारण बुलेट ट्रेनचे स्टेशन हे पालघर जिल्ह्यात देखील असणार आहे. चौथी मुंबई हे मुंबई, नवी मुंबई तसेच नव्याने विकसीत करण्यात येणार्‍या तिसर्‍या मुंबईला पर्याय ठरणार आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसर्‍या मुंबईबाबत माहिती दिली. जगातील सर्व विकसीत देश शहरीकरणामुळे विकसीत झाले आहेत. शहरीकरणामुळे देशाला चालना मिळते. अर्थ व्यवस्था निर्माण होते. यामुळेच महाराष्ट्रात नवी शहरं उभारली जात आहेत. रायगड जवळ तिसरी मुंबई, तर पालघर जवळ चौथी मुंबई निर्माण केली जाणार आहे. यामुळे एमएमआर रीजनचा जीडीपी 10 पटीने वाढू शकतो असं मुख्यमंत्री म्हणाले.

Comments


bottom of page