top of page

भारतात कोरोणा व्हायरसचे थैमान, सक्रिय रुग्णांची संख्या 2700 च्या वर !





भारतात कोरणाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. देशात कोविड-19 च्या सक्रिय रुग्णांची संख्या सध्या 2710 वर पोहहोचली आहे, ज्यामध्ये केरळ हे सर्वात जास्त प्रभावित राज्य आहे, आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये 1, 147 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर महाराष्ट्र 424, दिल्ली 294, गुजरात 223, कर्नाटक आणि तामिळनाडू 148 आणि पश्चिम बंगाल 116 आहे. दिल्लीत कोरोना विषाणूमुळे पहिला मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात सात नवीन मृत्यूची नोंद झाली असून, एकून मृतांची संख्या 22 झाली आहे. यापैकी दोन मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत, तर दिल्ली, गुजरात, कर्नाटक, पंजाब आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.


दिल्ली कोविड- 19 मृत्यू

दिल्लीत कोरोनामुळे महिलेचा मृत्यू, आरेाग्यमंत्री म्हणाले की, कोविड-19 मुळे झालेल्या महिलेच्या मृत्यूबद्दल दिल्लीचे आरोग्यमंत्री पंकज गुप्ता म्हणाले, माझ्या माहितीनुसार, ती महिला 70 वर्षापेक्षा जास्त वयाची होती. तिला कोविड व्यतिरिक्त इतर अनेक समस्या होत्या. अचूक अहवाल लवकरच येईल, त्यानंतर सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाईल,


देशात कोरोनाचे हे प्रकार सक्रिय!

तज्ज्ञांच्या मते, ओमिक्रॉनचे दोन नवीन उप-प्रकार -एलएफ.7 आणि एनबी .1.8- यामुळे देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर जेएन.1 अजूनही देशात प्रबळ प्रजाती आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अद्याप एलएफ.1.8 ला ‘चिंतेचे प्रकार’ किंवा ‘रुचीचे प्रकार’ म्हणून अपडेट केलेले नाही. जरी बहूतेक प्रकरणे सौम्य असली तरी, आरेाग्य अधिकार्‍यांनी लोकांना सतर्क राहण्याचे, मास्क घालण्याचे आणि गर्दी टाळण्याचे अवाहन केले आहे. सरकार परिस्थिवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि आवश्यकतेनुसार पावले उचलली जात आहे.

तज्ज्ञांचा सल्ला काय आहे?

डॉ. संजय राय सांगता,“ कॉमन कोल्डही कोरोना व्हायरसच्याच कुटूंबातील आहे . कोरोना व्हायरसचं कुटूंब हजारोंचं आहे पण या कुटूंबातले फक्त सात घटक माणसांसाठी अडचणी निर्माण करतात. नेहमीच्या सर्दीशी संबंधित चार व्हायरस आधीपासूनच अस्तित्वात होते. यानंतर 2004-05 मध्ये चीनमधूनच सार्स आला होता. 2012 -13 मध्ये मिडल ईस्टमधून मर्स-मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम आला. यानंतर 2019 साली कोरोन व्हायरस -2 अला ज्याला आपण कोविड-19 आजार म्हणतो.

ज्याप्रमाणे घरामध्ये एकाला सर्दी झाल्यानंतर घरातल्या संगळ्यांना होते. पण हे आजारपण इतकं गंभीर नसतं. कोरोनाही आता असाच झाल्याचं डॉ. राय म्हणाले.


नागरिकांनी काळजी घ्यावी:

मास्क घालणे अनिवार्य आहे, घराबाहेर पडताना नेहमीच मास्क घाला, विशेषत: गर्दीच्या ठिकाणी, मास्कने तुमचे नाक आणि तोंड व्यवस्थित झाका.


हातांची स्वच्छता राखा, कमीत कमी 20 सेकंद साबण आणि पाण्याने वारंवार हात धुवा, बाहेर पडताना सॅनिटायझर (60% अल्कोहोल असलेले) वापरा.


दोन यार्ड अंतर ठेवा, लोकांपासून कमीत कमी 6 फूट अंतर ठेवा, विशेष:जर कोणी आजारी असेल तर

गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, गरज नसल्यास लग्न, पार्टी, धार्मिक कार्यक्रम इत्यांदींना उपस्थित राहणे टाळा, बाजारात किंवा मॉलमध्ये कमी वेळ घालावा.


आजारी वाटत असल्यास घरीच रहा, जर तुम्हाला ताप, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा आणि घरीच रहा. शिंकताना किंवा खोकताना काळजी घ्या, टिश्यू किंवा कोपरात शिंकणे/ खोकणे. वापरलेले टिश्यू ताबडतोब कचर्‍याच्या डब्यात टाका.


लसीकरण करून घ्या, कोविड लसीचे सर्व आवश्यक डोस घ्या आणि बूस्टर डोसची जाणीव ठेवा.

तुमची रोग प्रतिकारक शक्ती मजबूत ठेवा.पौष्टिक अन्न खा, पुरेशी झोप घ्या आणि नियमित व्यायाम करा.

सरकारनी मार्गदर्शक़ तत्वांचे पालन करा, आरोग्य मंत्रालय आणि डब्ल्यूएचओ च्या सल्ल्यावर विश्वास ठेवा, अफवा टाळा.


Comments


bottom of page