भारताबाबत आखाती देशांमध्ये गैरसमज तयार होत आहेत - शरद पवार
- Navnath Yewale
- Jun 27
- 2 min read

इराण- इस्त्रायल यांच्याती संघर्षाबाबत भारतकडून कोणाची बाजू घेतली जात नसल्यामुळे आखाती देशात भारताबाबत गैरसमज तयार होत असल्याच्या भावना राष्ट्रवादी(श.प.) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केल्या. कोल्हापुर जिल्हा दौर्यावर असताना शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधताना व्यक्त केल्या. शरद पवार शुक्रवारी कोल्हापुर जिल्हा दौर्यावर होते यावेळी त्यांनी पत्रकार परिषदत घेवून ठाकरे बंधुंच्या युतीसह नरेंद्र मोदी यांच्या सोबत इस्त्रायल दौर्यासह डोनाल्ड ट्रम यांच्या श्रेयवादावर भाष्य केले.
इराण- इस्त्रायल युद्धाबाबत अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थीचा दावा केल्या नंतर मोठी चर्चा सुरू झाली आहे. भारत व पाकिस्तान यांच्यातील संघर्षातही डोनाल्ड ट्रम्प यांनी अशाच प्रकारे मध्यस्थीचा दावा केला होता. या पार्श्वभुमीवर मोदी सरकारने या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांच्या सांगण्यानुसारच भूमिका घेतल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. तसेच, शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना इ÷स्त्रायलला घेऊन गेले होते, असाही दावा केला जात असताना त्यावर खुद्द शरद पवारांनीच उत्तर दिलं आहे.
कोल्हापुर दौर्यादरम्यान शरद पवारांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना इराण-इस्त्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला श्रेयवाद आणि भारताची त्यावरची भूमिका याबाबत भाष्य केलं आहे. इस्त्रायल व इराणबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी येऊन घोषणा केली की जे काही निर्णय झाले ते मी घेतले. म्हणजे कोणताही निर्णय घेण्याचा अधकिर त्यांना नसताना ते सगळं श्रेय स्वत: घेतात. कुणाशी बोलतात माहित नाही. त्यामुळे त्यांची विधानं अस्वस्थ करणारी आहेत. युरोपातही अनेक देशांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वर्तनाबाबत नाराजी आहे. सौदी अरेबिया, कतार, अफगाणिस्तान, इराण या सगळ्या भागात अमेरिकेच्या भूमिकेबाबत नाराजी आहे. आपण स्पष्अ भूकिा घेतली पाहिजे असही शरद पवार म्हणाले.
“स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी या सगळ्यांनी या आखाती देशातील लोकांच्या भावना नजरेसमोर ठेवून त्यांना नेहमीच पाठिंबा दिला होता. आपण इस्त्रायलशी शेतीबाबत संबंध ठेवले. पण राजकीय संबंध आपण ठेवले नव्हते. पहिल्यांदाच भारत सरकार याबाबत स्पष्ट भूमिका घेत नसल्याचं दिसत आहे. त्याचा परिणाम हा सबंध आखाती देशांमध्ये भारताबद्दल गैरसमज तयार होत आहेत ही गोष्ट चांगली नसल्याचेही शरद पवार म्हणाले.
शरद पवार-नरेंद्र मोदी यांच्या इस्त्रायल दौर्याबाबत शरद पवार म्हणाले की. “ मी कृषीमंत्री असताना माझं इस्त्रायलला जायचं ठरलं. माझा कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर मला नरेंद्र मोदींचा फोन आला. ते तेव्हा मुख्यमंत्री होते. ते म्हणाले की इस्त्रायलमधील शेती व पाण्याची बचत यासंदर्भातील त्यांचं काम बघण्याची मला इच्छा आहे. तेव्हा त्या देशात जाण्यासाठी आपल्याकउे व्हिसा मिळत नसे. मोदींनी मला सांगितलं की तुम्ही जात आहात तर तुमच्या शिष्टमंडळात माझाही समावेश करा. मी हरकत नाही असं सांगितलं. मग मी पंतप्रधानांशी बोललो. त्यांनीही होकार दिला. तेव्हा माझ्यासोबत नरेंद्र मोदी तेव्हाच्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, हरियाणाचे मुख्यमंत्री असे अनेकजण होते” असं शरद पवारांनी सांगितलं.
Comments