भारतीय चलनात लवकरच प्लास्टिक नोटा, सरकारने दिली मंजुरी

नवी दिल्ली : येत्या काही दिवसांत तुमच्या हातात 10 किंवा 20 रुपयांची प्लास्टिकची (पॉलिमर) नोट आली तर आश्चर्यचकित होऊ नका. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) एका महत्वपूर्ण प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या प्रस्तावानुसार देशभरात 10 आणि 20रुपयांच्या पॉलिमर नोटांची ‘ फिल्ड ट्रायल’ (प्रत्यक्ष चाचणी) घेतली जाणार आहे.
संसदेच्या लोकसीा सत्रात एक लेखी प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी ही माहिती दिली, भारतीय हवामान, लोकांचा वापर आणि दैनंदिनी व्यवहरांच्या परिस्थितीत या प्लास्टिकच्या नोटा किती टिकाऊ ठरतात याची चाचणी घेण्यासाठी ही मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कागदी नोटा बंद होणार? : सरकारने यावर तत्काळ स्पष्टीकरण दिले असून सध्या चलनात असलेल्या कागदी नोटा टप्प्याटप्प्याने किंवा पूर्णपणे बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. पॉलिमार नोटा सध्याच्या नेहमीच्या कागदी नोटांसोबतच बाजारात चालतील. प्रत्यक्ष चाचणी यशस्वी ठरल्यानंतरच भतविष्यात या नोटांची मोठ्या प्रमाणावर छपाई करायची की नाही,
याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.
अनेकदा भाजी विक्रेते, बस प्रवास किंवा दैनंदिन छोटेखानी व्यवहरांमध्ये 10 आणि 20 रुपयांच्या नोटांचा वापर सर्वाधिक होतो. यामुळे कागदी नोटा फार लवकर मळतात, फाटतात किंवा खराब होतात. आरबीआयला अशा खराब झालेल्या नोटा सतत मागे घेऊन नवीन नोटा छापाव्या लागतात, ज्यावर मोठा खर्च होतो.
दरम्यान पॉलिमर नोटा प्लास्टिकसारख्या पदार्थापासून बनवलेल्या असल्याने त्या सहजासहजी फाटत नाहीत, पाण्यात भिजत नाहीत आणि मळतही नाहीत. या नोटांचे आयुष्य कागदी नोटापेक्षा खूप जास्त असल्याने छपाई आणि नष्अ करण्याचा आरबीआयचा अब्जावधी रुपयांचा खर्च वाचणार आहे.
बोगस नकली नोटांचा होणार पायबंद: रिझर्व्ह बँकेच्या मते पॉलिमर नोटांमध्ये आधुनिक वैशिष्ट्ये समाविष्ट करणे अधिक सोपे असते. या नोटांमध्ये एक विशिष्ट पारदर्शक खिडकी, विशेष सिक्युरिटी थ्रेड्स, प्रगत तंत्रज्ञानावरील सुरक्षा फीचर्स असेल यामुळे बनावट किंवा बनावट नोआ छापणे गुन्हेगारांसाठी अत्यंत कठीण होणार आहे. या प्लास्टिकच्या नोटा आल्यामुळे डिजिटल पेमेंटवर काही परिणाम होईल का, हे सांगणे सध्या घाईचे ठरेल असे सरकारने म्हटले आहे. रोख व्यवहार आणि डिजिटल पेमेंट हे दोन्ही एकमेकांना पूरक असून भविष्यातही दोन्ही माध्यमे सोबतच चालतील, असा विश्वास आरबीआयने व्यक्त केला आहे.



Comments