भाराताचे दोन विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसली; पाकिस्तान धमकी देत राहीला
- Navnath Yewale
- May 6
- 1 min read

पाकिस्तानच्या धमक्यांना न जुमानता भारातने पुन्हा एकदा आपली आक्रमकता दाखवली आहे. 24 एप्रिल रोजी पाकिस्तान भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली होती. मात्ररू यानंतरही दोन भारतीय विमाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसली, ज्यामुळ पाकिस्तानी लष्कर आणि प्रशासन हादरुन गेले. या घटनने भारताच्या निर्धार आणि सामर्थ्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.
भारतीय विमानांचा पाकिस्तानी हवाई हद्दीत प्रवेश
पाकिस्तानने हवाई बंद केल्यानंतरही एयर इंडिया एक्सप्रेसची फ्लाइट आयएक्स -191 आणि इंडिगो एअरलाइन्सची फ्लाईट 6ई- 1481 या दोन भारतीय विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश केला. फ्लाइट आयएक्स -191 अमृताीहून दुबईला जात होती, तर 6ई-1481 चंदीगडहून दुबईच्या दिशेने निघाली होती.
या दोन्ही विमानांनी निर्धारित मार्गाने आपली यात्रा पूर्ण केली आणि पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून शानदारपणे पुढे गेली. याशिवाय, शारजाहहून अमृतसरला जाणारी इंडिगोची आणखी एक फ्लाइट 6इ-1481 ही पाकिस्तानी हवाई हद्दीच्या सीमेवर पोहोचली होती. परंतु ती इराणच्या हवाई हद्दीतून पुढे गेली.
पाकिस्तानची हतबलता आणि भारताची ताकद
पाक्सितानी हवाई वाहतूक नियंतण आणि इतर यंत्रणा या ीारतीय विमानांच्या प्रवेशामुळे गांधळात पडल्या. भारतीय विमानांना रोखण्याची हिंमत पाकिस्तानच्या लष्कराने दाखवली नाही. दोन्ही विमानांना त्यांच्या मार्गाने जाण्याची परवानगी देण्यात आली.
विशेष म्हणजे, शारजाहहून अमृतसरला जाणार्या इंडिगोच्या फ्लाइट 6इ- 1428 हवाई हद बंद बसल्याची माहिती वेळीच मिळाली. यामुळे पायलटने दक्षिणेकडे मार्ग बदलला आणि इंधन भरण्यासाठी अहमदाबादकडे वळले. अशा प्रकारे, तिन्ही भारतीय विमाने आपल्या गंतव्यस्थानाकडे निर्धारित मार्गाने पुढे गेले, तर पाकिस्तानला हतबलतेने हात चोळत रहावे लागले.
भारताची रणनीती आणि भविष्यातील शक्यता
या घटनेने भारताच्या रणनीतिक सामर्थ्याचा आणि धाडसी दृष्टिकोनाचा पुन्हा एकदा पुरावा दिला आहे. भारतीय विमानांनी केवळ आपली यात्रा पूर्ण केली नाही, तर पाकिस्तानच्या हवाई हद्दीतील प्रवेशाने त्यांच्या कमकुवतपणावर प्रकाश टाकला. भविष्यातही भारत अशा प्रकारे आपली ताकद दाखत राहील, अशी शक्यता आहे. पाकिस्तानच्या धमक्यांना न जुमानता भारताने आपली आक्रमकता कायम ठेवली आहे, आणि ही घटना त्याचेच प्रतीक आहे.
Kommentare