top of page

भाविकांच्या पैशावर डल्ला मारण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग माजी खासदार राजू शेट्टी यांचा आरोप...





राष्ट्रीय महामार्ग तयार असताना त्याच भागातून दुसरा समांतर रस्ता करण्याची गरज नसताना शक्तीपीठ महामार्ग लादला जात आहे. हा मार्ग होऊ देणार नाही असे आव्हान शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट सरकारला दिले आहे.

 

नागपूर ते कोल्हापूर असा शक्तीपीठ महामार्ग राज्य सरकारच्या माध्यमातून तयार करण्यात येत आहे. हा मार्ग नांदेड जिल्यातून जात असून मोठ्या प्रमाणात बागायती शेती या रस्त्यात जाणार आहेत. या महामार्ग ला बहुतेक शेतकऱ्यांचा विरोध आहे. नागपूर ते कोल्हापूर व्हाया धाराशिव असा राष्ट्रीय महामार्ग तयार असताना त्याच भागातून दुसरा समांतर रस्ता करण्याची गरज नसताना शक्तीपीठ महामार्ग निर्माण केला जात आहे.


 

भाविकांच्या पैशावर डल्ला मारण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग निर्माण केला जातो आहे असे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले. जवळपास २७ हजार एकर जमीन या महामार्गा् त बाधित होणार असून जमीन देण्यासाठी शेकऱ्यांचा तीव्र विरोध असून स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांना सोबत असल्याचे शेट्टी म्हणाले.

 

हदगाव तालुक्यातील रुई (धानोरा) येथे शक्ती पीठ महामार्गास विरोध करण्यासाठी राजु शेट्टी यांच्या उपस्थितीत आज सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला उपस्थित राहण्यासाठी ते काल नांदेड येथे आले होते. दरम्यान त्यांची भेट घेतली आणि शासकीय रेस्ट्ट हाऊस वर संवाद साधला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेश अधक्ष प्रा प्रकाश पोपळे, यूवराज राजेगोरे हे उपस्थित होते.

 

Comments


bottom of page