भिडेंसारख्या वाचाळविरांना सत्ताधार्यांनी लगाम लावावा !
- Navnath Yewale
- May 24
- 2 min read

रायगडावर साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा 6 जून रोजी साजरा करण्याची पद्धत बंद करून हा सोहळा तिथीनिुसार साजरा करावा, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं. यावर जितेंद्र आव्हाड यांनी टिका केली आहे. दरम्यान शिवराज्याभिषेक सोहळ्या विषयी केलेल्या वक्तव्याचा शिवप्रेमींतून निषेध व्यक्त करण्यात येत असून संभाजि भिडे यांच्या विरोधात सोशल मिडियावर संताप व्यक्त होत आहे.
दरवर्षी 6 जून रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. तसेच या सोहळ्याला हजारो शिवप्रेमी उपिस्थत राहतात. मात्र, रायगडावर साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा 6 जून रोजी साजरा करण्याची पद्धत बंद करून हा सोहळा तिथीनूसार साजरा करावा असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा शिवप्रेमींकडून निषेध केला जात असून भिडे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका होत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भिडे यांच्यावर जोरदार टिका केली आहे. ते म्हणाले की, आपलं वय झालं म्हणून आपण काहीही बरळत बसू नये. आपल्या तोंडावर थोडा तरी लगाम लावला पाहिजे, शिवराज्याभिषेक उत्सव बंद करणे तुमच्या सात जन्मान तरी तुम्हाला शक्य नाही. जोपर्यंत सूर्य चंद्र तारे राहतील तोपर्यंत रायगडावर 6 जूनला शिवरायांना मानवंदना आणि तोफेची सलामी दिली जाईल. भिडेंसारख्या वाचाळ विरांना सत्ताधार्यांनी लगाम लावावा अन्यथा महाराष्ट्राचा अपमान आम्ही कदापी सहन करणार नाहीत.भेटू रायगडावर.. जय शिवराय असे ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी संभाजी भिडे यांच्यावर टिका केली आहे.
नेमकं काय म्हणाले संभाजी भिडे
रायगडावरील 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरुपी बरखास्त करायला पाहिजे, शिवराज्याभिषेक सोहळ्याचा राजकारणासाठी वापर होत असल्याचे संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. संभाजी भिडे यांनी कोल्हापुरात बोलताना हे भाष्य केलं. ते म्हणाले की, तिथीप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम पार पडले पाहिजेत. दरम्यान, भिडे यांनी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरुनही भाष्य केलं आहे. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढायला नको, या कुत्र्याबद्दल जे इतिहास संशोधक बोलतात ते कोणत्या उंचीचे आहेत? अशी विचारणा केली या बाबत एक स्वतंत्र इतिहास संशोधक मंडळ स्थापन करून त्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणीही भिडे यांनी केली.
Comments