भोकर हट्टी आरोग्य उपकेंद्राची तातडीने दुरुस्ती करा- बळवंत गावित
- Navnath Yewale
- Sep 3
- 1 min read

जव्हार: तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कौलाळे अंतर्गत भोकर हट्टी येथील आरोग्य उपकेंद्र दिनांक१० मे २०२५ रोजी झालेला वादळी वाऱ्याने उपकेंद्राचे मागील बाजूचे पूर्ण छत उखडून गेले. मागील चार महिन्यात कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केली नाही. त्यामुळे भोकर हट्टी गावातील येथील आदिम जमातीच्या माणसांना आरोग्य सुविधा मिळणे कठीण झाले आहे. त्यांना नांदगाव किंवा जव्हार येथे वैद्यकीय उपचारासाठी जावे लागते. व खर्चिक सुद्धा आहे हे कळताच काँग्रेसचे कार्यकर्ते बळवंत गावीत संपत पवार त्या गावात गेले असता निदर्शनास आले.
तातडीने दुरुस्तीसाठी व आरोग्याची व्यवस्था पुनर्गठीत करण्यासाठी जव्हार पंचायत समिती गटविकास अधिकारी जव्हार दत्तात्रय चित्ते यांना लेखी निवेदन देऊन आठ दिवसात व्यवस्था पूर्ववत न झाल्यास पंचायत समिती कार्यालयात हल्लाबोल आंदोलन करण्याचा गंभीर इशारा दिला. यावेळी पांडुरंग बरतड शैलेश कांमडी परशुराम गावित पत्रकार सोमनाथ टोकरे व अन्न पदाधिकारी उपस्थित होते.



Comments