top of page

मंत्रालयातून माझ्याविरोधात कट गृहविभाग कामाला लागलाय - जरांगे पाटील

अंतरवाली : माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येची सुपारी दिली होती, असा अरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात खळबळ उडवून दिली होती. या आरोपत किती तथ्य आहे हे समोर येण्याआधीच आता जरांगे पाटील यांनी नवा आरोप करत आपल्याविरोधात थेट मंत्रालयातून कट रचला जात असल्याचा दावा केला आहे. गृहविभागही कामाला लागला आहे, या कटाची माहिती आपण काढली असूनत्यात तथ्य आढळून आल्याचे जरांगे पाटील म्हणाले.


मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी (दि.26) एका जाहीर कार्यक्रमात बोलताना हा गंभीर आरोप केला. यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, मंत्रालयातून रचल्या जात असलेल्या कटाची माहिती आपल्या त्याठीकाणी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने दिली आहे. 1 ते 6 फेब्रूवारी दरम्यान, हा कट रचला गेला आहे. मी समाजासाठी, गोरगरिबांसाठी काम करतो हे त्यांना पहावत नाही, पण मी देखील काही कमी नाही. या कटाची माहिती काढण्यासाठी आपले काही लोक कामाला लावले होते. त्यांनी कट केला जात असल्याच्या आरोपाला दुजोरा दिला आहे. पण त्यांचा हा डाव मी हाणून पाडणार, असा दावाही जरांगे पाटील यांनी केला आहे.


मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही महिन्यापूर्वी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करत त्यांची आणि माझी नार्को टेस्ट करा, ब्रेन मॅपिंग करा, अशी मागणी केली होती. या प्रकरणात ज्या आरोपींना अटक केली होती, त्यांनीही आता मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात समोर येत काही आरोप केले आहेत.

हे प्रकरण तापत असतानाच आता मनोज जरांगे पाटील यांनी आणखी एका कटाबद्दल भाष्य करत खळबळ उडवून दिली आहे.


एका जाहीर कार्यक्रमात मनोज जरांगे यांनी मंत्रालयात आपल्या विरोधात कट रचला जात आहे असल्यासचा आरोप केला. एका महिलेचाही यात समावेश आहे. मंत्रालयातील एका दालनात झालेल्या बैठकीत केव्हा, कधी? काय करायचे हे सर्व ठरले आहे.

यासाठी सध्या स्टिंग ऑपरेशनही केले जात आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी मी जाहीर बोलत नाही. पण हा कट आणि तो रचणार्‍यांचा डाव आपण हाणून पाडू, असा दावाही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. काहीही झाले, कितीही कट षडयंत्र रचले तरी मी समाजासाठी लढत राहणार, मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, असेही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

Comments


bottom of page