top of page

मंत्रिपदाची शपथ घेताच ...





बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडशी जवळीक नडल्याने धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रीपदी कोण विराजमान होणार ? याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष होते. अखेर सत्तास्थापनेमध्ये मंत्रिपदासाठी डावलण्यात आलेले राष्ट्रवादी(अजित पवार) पक्षाचे छगन भुजबळ यांची (दि.20मे) मंत्रिपदी वर्णी लागली.


सरकारस्तरावरुन ओबीसी मंत्र्याच्या जागी ओबीसी मंत्री असा समतोल राखण्यात आला असला तरी छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यातील मतभेद उभ्या महाराष्ट्राला ज्ञात आहेत. मंत्रिपदाच्या शपथेनंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकां विरोधात वक्तव्य केल्यानंतर समर्थकांतून प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.


धनंजय मुंडे याच्या राजीनाम्या नंतर त्याच्या रिक्त जागी मंगळवारी (20 मे) ओबीसी नेते तथा राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची वर्णी लागली. दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आक्षण आंदोलन उभारल्या पासून छगन भुजबळ यांच्यावर सडकून टिका केली. मराठा आरक्षणाला छगन भुजबळ विरोध करत असून त्यांनी इतर ओबीसींचे आरक्षण खाऊन टाकल्याचा आरोप आसो की अगदी शिवराळ भाषेतून टिकाही त्यांनी वारंवार केली.


विधान सभा निवडणूकीत मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे करण्याची घोषणा केल्या नंतर सर्वच राजकीय पक्षांनी देव पाण्यात ठेवले होते. पण ऐनवेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणार्‍यांना पाडण्याचा चंग बांधून उमेदवार उभे करण्याचा निर्णय मागे घेतला. शिवाय छगन भुजबळ यांच्या येवला-लासलगाव मतदार संघात जाऊन जरांगे पाटील यांनी निवडणूकीचे वारं फिरवलं.


मराठा आरक्षणाला छगन भुजबळ व त्याचे समर्थक विरोध करत असल्याचा मुक संदेश मराठा समाजामध्ये गेला. विधानसभा निवडणूकीत ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्यामुळे जरांगे पाटील यांना काही प्रमाणात समाजाची नाराजी पत्करावी लागली. विधानसभा निवडणूकीत महायुतीला बखळ यश मिळाल्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळापासून अलिप्त ठेवले. त्यामुळे छगन भुजबळ यांनी उघड नाराजी व्यक्त केली.


कार्यकर्ता मेळाव्यामध्ये स्वतंत्र पक्ष स़्थापनेच्या वल्गनाही करण्यात आल्या. धनंजय मुंड——े यांच्या राजीनाम्या नंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष असतानाच अचानक अवघ्या एका दिवसात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव जाहिर करून (20 मे ) रोजी त्यांचा मंत्रिपदाचा शपथविधी संपन्न झाला. यावर मनोज जरांगे पाटील यांनी सडकून टिका करत उष्ट्या पत्रावर जेवन, म्हातार पणी पाया पडून मिळावलेलं पद, त्याने आता मराठा द्वेष सोडून द्यावा, अजित पवार जातीवादी माणंस संभाळत आहेत असे आरोप करत मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सडकून टिका केली.


तत्पूर्वी अजित पवार जिल्हा दौर्‍यावर असताना अंबाजोईमधील नियोजीत कार्यक्रमा नंतर शिवराज दिवटे याची भेट घेतली नाही त्यामुळे मराठा समन्वयकांनी नाराजी व्यक्त केली. आणि अवघ्या अजित पवारांनी बीड सोडताच छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाची वार्ता कळाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार यांच्यावर टिका केली.


मंत्रिपदाची शपत घेतल्या नंतर माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी राज्यातला मराठा समाज मोठा बांधव असल्याचे आम्ही मानतो पण या जरांगे पाटलाने राज्यातील मराठा समाजाचे मोठे नुकसान केल्याचा आरोप केला. प्रदिर्घ काळानंतर दोन्ही नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याने आता पुन्हा राज्यातील सामाजीक वातावरण ढवळून निघणार आहे.


कोण काय म्हणालं


मी पक्ष सोडलेला नाही- छगन भुजबळ

अजित पवार हे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी निर्णय घेतला म्हणूनच मी मंत्रिमंडळात आलो. अजित पवार, सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि संपूर्ण राष्ट्रवादी मी आभारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचाही आभारी आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं


आमचे किती मतभेद असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट हा मी सोडलेला नव्हा. आगामी काळातही आमच्या पक्षाला चांगलं यश मिळावं म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत. मंत्रिपदाची जबाबदारी दिली गेली आहे. खातं कुठलं? अजून काही जबाबदारी द्याची असेल तर तो निर्णय मुख्यमंत्र्यांचा असतो असंही भुजबळ म्हणाले आहेत. त्यानंतर त्यांनी मनोज

जरांगे यांच्याबाबतही भाष्य केलं.


मनोज जरांगेमुळे मराठा समाजाचं नुकसान “ मनोज जरांगेने चुका नाही तर खेळ केले आहेत. महाराष्ट्रातल्या संपूर्ण मराठा समाजाचं प्रचंड नुकसान केलं आहे. गावागवांमध्ये त्यामुळे मराठा समाजालाही निश्चितपणे त्रास झाला. मराठा समाज हा सगळ्यात मोठा बांधव म्हणून महाराष्ट्रात राहतो. पण ह्या जरांगेच्या कर्तुत्वामुळेच निश्चितपणे मराठा समाजालाच त्रास झाला आहे” असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.


मनोज जरांगे पाटील

छगन भुबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली किंवा नाही घेतली हा त्यांचा पक्षांतपर्गत प्रश्न आहे. छगन भुजबळ मंत्री झाले याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही. अजित पवार जातीयवादी लोकं पासायंच काम करत आहेत, अजित पवार प्रचंड मोठी चूक करत आहेत. याच्या परिणामाला त्यांना समोर जावं लागेल, असा थेट इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Comments


bottom of page