मंत्री झिरवाळांच्या शासकीय निवास्थानातील आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल, राज्याच्या राजकारणात खळबळ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. त्याचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये झिरवाळांसोबत अजून दोन व्यक्ती दिसत असून या व्हिडिओवरुन वेगवेगळे दाव केले जात आहे. हा व्हिडिओ झिरवाळांच्यवा प्रशासकीय निवासस्थानावरील असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओमध्ये झिरवाळ हे घरात नेहमीसारखे शर्ट लेहंग्यात दिसत आहेत. मात्र त्यांच्यासोबत त्यांच्या रुममध्ये दोन व्यक्ती दिसत असून हा व्हिडिओ नेमका कोणी समोर आणला हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र व्हिडिओमधील घडामोडींमुळे झिरवाळ पुन्हा अडचणीत अडकण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वीच झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयामध्ये लाचखोरीचं प्रकरण समोर आलं होतं. येथे काम करणार्या कर्मचार्याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं होतं. त्यानंतर पक्षाच्या प्रमुख आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी झिरवाळ पक्षाच्या बैठकीमध्ये सुनावल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. हे प्रकरण शांत होत असतानाच आता झिरवाळ यांची आक्षेपार्ह चित्रफित समोर आल्याने ते अडचणीत आले आहेत. या संदर्भात आम्ही मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. या विषयावर झिरवाळ काय बोलतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
या प्रकरणावरुन आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना “ यावर मी उत्तर देणं योग्य वाटत नाही . एखाद्याच्या बेडरुममध्ये जाऊन व्हिडिओ काढणे आणि बाहेर आणून पत्रकारिता करणे योग्य नाही. पण राज्यात एकप्रकारे अधपतन सुरू आहे. ज्यांचे व्हिडिओ आले आहेत त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी, व्यक्तींनी बोलावं मग आम्ही त्यावर बोलू, आता बोलणे योग्य नाही” असं म्हणत थेट प्रतिक्रिया देणं टाळलं.
झिरवाळ हे अडचणीत आलेले राष्ट्रवादीचे तिसरे मंत्री ठरले आहेत. यापूर्वी संताष दशमुख हत्या प्रकरणामध्ये प्रकरणामध्ये प्रमुख आरोेपी वाल्मिक कराडसोबत जवळीक नडल्याने धनंजय मुंडे यांना मागील वर्षी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून धनंजय मुंडे यांच्याकडे कोणतंही मंत्रीपद नाही. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांना जून्य प्रकरणातून राजीनामा द्यावा लागला. आणि आता नुकत्याच समोर आलेल्या अशोक खरात प्रकरणामध्ये राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. रुपाली चाकणकर यांना महिला अयोगाच्या प्रमुख म्हणून राज्यमंत्रीपदाचा दर्जा होता. आणि आता पुन्हा व्हायरल व्हिडिओमुळे राज्याचे अन्न व औषध मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.



Comments