top of page

मंत्री शिरसाट जरांगे पाटलांच्या भेटीला ! परळी तालुक्यातच नोंदी का सापडत नाहीत? जरांगे पाटलांचा रोख कोणाकडे


राज्याचे सामाजीक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीगनरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी येथे आज भेट घेतली. मंत्री शिरसाट अणि जरांगे पाटील यांच्या भेटीने अनेकांच्या भुवाया उंचावल्या आहेत. दरम्यान, नोंदी असताना प्रमाणपत्र दिले जात नाहीत, जात प्रमाणपत्र असताना पडताळणी प्रमाणपत्र दिले जात नसल्याचा आरेाप करत जरांगे पाटील यांनी मंत्री शिरसाट यांच्याकडे विद्यार्थी प्रवेशप्रकियेतील अडचणींचा पाढा वाचला.

सध्या शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नोंदी नुसार ज्यांना जात प्रमाणपत्र मिळाले आहेत त्यांच्या पडताळण्या रोखून ठेवल्या आहेत. नोंदी असताना जात प्रमाणपत्र वाटप केले जात नसल्याचा आरोप करत मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी प्रशासकिय अधिकार्‍यांकडे बोट दाखवले आहे.


महाविद्यालयीन शिक्षणासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्रा अभावी प्रवेश प्रक्रियेतून डावलण्याची भिती व्यक्त करत जरांगे पाटलांनी मराठवाड्यातील मोजक्या जिल्ह्याच्या तालुक्यात नोंदी असताना प्रमाणपत्र, प्रमाणपत्र असताना जातपडताळणी प्रमाणपत्र वाट केले जात नसल्याने अधिकार्‍यांच्या कर्तव्यावरच प्रश्न उपस्थित केला.


दरम्यान, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाला डावलून स्थानिक पातळीवर अधिकारी जानिवपूर्वक कर्तव्यात कसूर करत आहेत. नोंद आहे , वंशावळ जुळलेली असताना अधिकारी जानिवपूर्वक प्रमाणपत्र वाटप करत नाहीत. अधिकार्‍यांनीच ठरवलंय सरकारला, ज्या त्या खात्याला बदनाम करण्याचे असंही जरांगे पाटील म्हणाले मराठवाड्यातील मोजक्या जिल्ह्यातील निवडक तालुक्यात नोंदी सापडत नाहीत घनसांगवी, सिल्लोड, अंबड आणि बीडमधील परळी तालुक्यात नोंदीच सापडत नाहीत ज्यांच्या सापडल्या त्यांना प्रमाणपत्र वाटप केले जात नाही.


दरम्यान, मंत्री संजय शिरसाट यांना स्वत: बोलावून घेतले, त्यांना काम सांगितले की ते करतात. मराठा आरक्षणावर बोलण्यासाठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यासह 288 आमदारांना फोन लावून 30 जून पर्यंत अंतरवालीत बोलावणार आहे. 29 जून ला राज्यव्यापी बैठक आहे. त्यासाठी सरकारने त्वरीत आमच्या मागण्यांची अम्मलबजावणी करावी तिन्ही गॅजेट लागू करावे, सगे सोयरे आंमलबजावणी करावी आम्ही गुलाल घेवून येवू अन्यथा आम्हाला 29 ऑगस्टला मुंबईत यायला लावू नका असा इशाराही त्यांनी मंत्री शिरसाट यांच्या समक्ष सरकारला दिला आहे.


माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, परळी तालुक्यातच नोंदी का सापडत नाहीत याचे गुपीत काय? ज्याच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र वाटप केले जात नसल्याचा आरोप करत जरांगे पाटील यांनी मुंडे बंधू भगिणींकडे बोट दाखवले आहे.

Comments


bottom of page