मंदिच्या दिशेने वाटचाल !ट्रम्प टॅरिफमुळे खळबळ, अमेरिकेत जंक बाँड विक्री
- Navnath Yewale
- Apr 8
- 2 min read

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या यांनी सुरु केलेल्या टॅरिफ वॉरनंतर संपर्ण जगात खळबळ उडाली आहे. यानंतर आता जगातील अनेक देशांनी अमेरिकेला जशास - तसं उत्तर द्याचीही तयारी सुरु केली आहे. ट्रम्प यांनी या टॅरिफला कडू औंषध असं संबोधल आहे असं असल तरी याचा फटका अमेरिकेलाही मोठ्या प्रमाणात बसताना दिसून येत आहे.
दुसरीकडे जगभरातील मंदीचंही सावट निर्माण होण्याची शक्यता आहे. जेपी मॉर्गननंही जगात मंदी येण्याची 60 टक्के शक्यता असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे 2020 नंतर अमेरिकेच्या जंक बाँड मार्केटमध्ये सर्वात मोठी विक्री झाली आहे. यामुळे गुतवणूकदारांमध्ये वाढत्या चिंतेचे संकेत मिळत आहेत.
आयसीई बोफाच्या आकडेवारीनुसार, डिफॉल्ट जोखमीसाठी प्रॉक्सी असलेल्या अमेरिकन सरकारी रोख्यांच्या तुलनेत स्पक्युलेटिव्ह रेटेड कॉर्पोरेट डेट ठकवण्यासाठी प्रीमियम गुंतवणूकदारांची मागणी बुधवारपासून 1 टक्यांनी वाढून 4.45 टक्के झाली आहे. 2020 मध्ये कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमिवर व्यापक लॉकडाऊन सुरू झाल्यानंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे.
ट्रम्प यांनी अमेरिकेचे शुल्क शतकातील उच्चांकी पातळीवर नेलं तेव्हापासून कॉर्पोरेट रोख्यांमधील विक्रीमुळ गुंतवणूकदारांची चिंता अधोरेखित झाली आहे. या निर्णयामुळे आर्थिक उत्पादनावर परिणाम होईल आणि बेरोजगारी वाढेल, तसंच कमकुवत कंपण्यांना त्यांचे कर्ज फेडण्यासाठी संघर्ष करावा लागेल असं विश्लेषकांचे म्हणणे आहे. शुक्रवारी जेपी मॉर्गननं अमेरिकेच्या आर्थिक अंदाजात कपात केली आणि 2025 मध्ये 0.3 टक्यांची घसरण होण्याचा अंदाज व्यक्त केला. बेरोजगारीचा दर मार्चमधील 4.2 टक्यांवरुन 5.3 टक्यांवर जाईल, असंही अहवालात म्हटलं आहे.
जंक बाँड म्हणजे काय?
जंक किंवा हाय-यीलड बाँडस हे कमी क्रेडिट रेटिंग असलेल्या कंपण्या किंवा संस्थाद्वारे जारी केलेले फिक्स्ड-इनकम सिक्युरिटीज आहेत. हे क्रेडिट रेटिंग इन्व्हेस्टमेंट ग्रेड बाँड्सपेक्षा डिफॉल्टची जास्त शक्यता दर्शवतं. गुंतवणूकदाराला अतिरिक्त जोखीम भरुन काढण्सासाठी जंक बाँड सहसा जास्त उत्पन्न देतात. जंक हा शब्द या बाँड्सची सर्वात कमी क्रेडिट गुणवत्ता दर्शवितो, परंतु याचा अर्थ असा नाही की ते अयोग्य ठरतात.
जंक बाँड्स कसे काम करतात.
जेव्हा एखाद्या कंपनीला बाँड जारी करुन भांडवल उभं करायचं असतं, तेव्हा ती इतर प्रकारच्या बाँड्सप्रमाणेच प्रक्रियेतून जाते. कंपणी बाँडच्या अटी ठरवते, ज्यात व्याजदर, मॅच्युरिटीची तारीख आणि परतफेडीच्या अटींचा समावेश आहे. जंक बाँडच्या संभाव्य उच्च परताव्यात स्वारस्य असलेले गुंतवणूकदार हे सिक्युरिटीज खरेदी करतात. जारीकर्ता जंक बाँडच्या विक्रीद्वारे मिळालेल्या निधीचा वापर त्याचं ऑपरेशन, विस्तार किंवा इतर आर्थिक गरजा भागविण्यासाठी करतो.
Commentaires