top of page

मणिपुरमध्ये भारतीय लष्कराची मोठी कारवाई; भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांत भीषण चकमक, 10 दहशतवादी ठार





मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात अतिरेकी आणि आसाम रायफल्समध्ये भीषण चकमक झाली. भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडने सोशल मिडीयावर एका पोस्टद्वारे ही माहिती शेअर केली आहे. माहितीनुसार, आसाम रायफल्सने 10 अतिरेक्यांना ठार केले आहे. या कारवाईची माहिती देताना अधिकर्‍यांनी सांगितले की, सशस्त्र अतिरेक्यांच्या हलाचलींबद्दल लष्कराला गुप्त माहिती मिळाली होती.


जेव्हा लष्कराच्या तुकडीने कारवाई सुरू केली तेव्हा, अतिरेक्यांनी हल्ला करायला सुरुवात केली. त्यांच्याकडून जोरदार गोळीबार सुरू झाला, त्यानंतर सैन्याने प्रत्युत्तर दिले. यामध्ये 10 अतिरेकी मारले गेले आहेत, अणि अणखी काही लपून बसल्याची भीती आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि स्फोटकेही जप्त करण्यात आली आहेत. लष्कराची कारवाई अजूनही सुरू आहे.



लष्कराने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, मणिपूरच्या चांदेल आणि आसपासच्या भागात लष्कराचे शोध अभियान सुरू आहे. हे क्षेत्र भारत-म्यानमार सीमेजळ आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा परिसर अतिशय संवेदनशील आहे आणि अतिरेकी कारवायांचे केंद्रही राहिला आहे.


आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या भागात आणखी काही दशहतवादी लपले असण्याची शक्यता आहे. सध्या लष्कराची कारवाई सुरू आहे. मणिपूरमध्ये गेल्या दोन वर्षाहून अधिक काळ अशांतता आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असताना ही कारवाई करण्यात आली आहे.


लष्करी कारवाई बाबत मिळालेल्या माहितीनुसार, असाम रायफल्सची एक तुकडी चांदेल जिल्ह्यात शोध मोहिम राबवत आहे. लपून बसलेल्या अतिरेक्यांनी लष्करी तुकडीवर गोळीबार सुरू केला. लष्कराच्या प्रत्युत्तरात 10 दहशतवादी ठार झाले आहेत.


चांदेल जिल्हा हा मणिपूरचा सीमावर्ती भाग आहे. या जिल्ह्याचा एक भाग थेट बर्माच्या सीमेला लागून आहे आणि अनेक वेळा या भागाचा वापर बेकायदेशीर कारवाया करण्यासाठी देखील झाला आहे. सीमावर्ती जिल्ह्यात लष्कराचे शोध अभियान अजूनही सुरू आहे.

Comments


bottom of page