top of page

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; ‘ अरंबाई टेंगगोल’ च्या वतिने दहा दिवसांचा राज्यव्यापी बंद



केंद्रीय ÷अन्वेषण ब्युरो (सीबीआय) च्या भ्रष्टाचार विरोधी शाखेने गुवाहटी येथील अरंबाई टेंगगोल संघटनेच्या नेत्या कानन यांना अटक केल्या नंतर मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफळला आहे. आतापर्यंत या हिंसाचारात 11 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. या हिंसाचाराच्या दरम्यान, मणिपूरच्या अरंबाई टेंगगोल संघटनेने अटक केलेल्यांची बिनशर्त सुटका करण्याची मागणी करत दहा दिवसांचा राज्यव्यापी बंद पुकारला आहे.


मेईतेई समुदायाचे नेते अरंबाई टेंगगोल यांना 2023 च्या मणिपूर हिंसाचाराशी संबंधित विविध गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल इम्फाळ विमानतळावर त्यांना अटक करण्यात आली. पोलिस अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, कानन यांना शनिवारी इम्फाळ येथून अरंबाई टेंगगोलच्या इतर चार सदस्यांसह अटक करण्यात आली. मात्र, सीबीआयच्या अधिकृत निवेदनात फक्त काननच्या अटकेची पुष्टी करण्यात आली आहे.


दरम्यान, सीबीआयच्या मते, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सध्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीमुळे प्रकरणांचा खटला मणिपूरहून गुवाहाटी येथे हलविण्यात आला आहे. सीबीआयच्या मते, काननला गुवाहटी येथे नेण्यात आले असून पोलिस कोठडीसाठी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

अटकेनंतर हिंसाचार उफळला:

3 मे 2023 रोजी मणिपूरमध्ये झालेल्या ह्रदयद्रावक वांशिक हिंसाचारामागे कानन आणि त्याची संघटना होती. मेईतेई नेते काननअरंबाई टेंगगोल हे संघटनेचे एक प्रमुख सदस्य आहेत. आणि त्यांचा समाजावर मोठा प्रभाव आहे. काननवर मणिपूर आणि त्यांच्या संघटनेत वांशिक हिंसाचार भडकवण्याचा आरोप आहे. पोलिस सूत्रांनूसार,2023 च्या मणिपूर हिंसाचारात कानन खून आणि खंडणीच्या प्रकरणांमध्ये सहभागी होता.


‘अरांबाई टेंगगोल’ म्हणजे काय? :

2020 मध्ये सांस्कृतिक पुनर्जागरण गट म्हणून अरंबाईटेंगगोल संघटनेची सुरवात झाली अरंबाई टेंगगोलचा शब्दश: अर्थ ‘भाला फेकणारे घोडेस्वार’ असा होतो. कांगलेईपाक म्हणून ओळखल्या जाणार्‍या या संघटनेने वारसा आणि सनमही धर्माच्या प्रचाराबद्दल बोलले आहे . या संघटनेचा उद्देश मेईतेई समुदायाची ओळख, संस्कृती आणि भूतकाळ पुनरुज्जीवन करणे आहे.


अरंबाई टेंगगोल संघटनेची स्थापना:

अरंबाई टेंगगोल संघटनेची मेईतेई समुदायातील काही कट्टरपंथी तरुण आणि परंपरावादी विचारवंतांनी केली होती. यापैकी बरेच जण आधीच मणिपूरी संस्कृती आणि सनमही धर्माच्या प्रचाराशी संबंधित होते.

मणिपूर हिंसाचाराशी या संघटनेचा संबंध?:

सांस्कृतिक संघटना सुरू झालेल्या अरंबाई टेंगगोलने राजकीय बाबींमध्ये हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली, आणि लवकरच ती कट्टरपंथी सशस्त्र संघटनेत रुपांतरित झाली. 2024 मध्ये, या संघटनेने कांगला किल्ल्यावर एक महत्वाची बैठक घेतली. ज्यामध्ये अनेक आमदारांनाही आमंत्रीत करण्यात आले होते. 3 मे 2023 रोजी, जेव्हा मणिपूरमध्ये मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये हिंसाचार झाला, तेव्हा अरंबाई टेंगगोलशी संबंधित लोकांनी कुकी समुदायाविरुद्ध हिंसाचार भडकावल्याचा आरोप आहे. मेईतेई समुदायासह त्यांनी कुकी समुदायाच्या गावांना आगी लावल्या आणि लुटमारही केली.

Commentaires


bottom of page