मनेसे नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल !आमदार भास्कर जाधवांचा नाव घेत ठाकरेंनाच लक्ष
- Navnath Yewale
- Jun 24
- 2 min read

शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीच्या चर्चां जोरात सुरू आहेत. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यातील दुरावा संपून दोघेही एकत्रित येतील असे संकेत आहेत. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन होत असताना दुसरीकडे मात्र मनसेचे नेते संदीप देशपांडे हे शिवसेना ठाकरे गटाविरूद्ध चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. सोमवारी ठाकरे गटावर टिका केल्यानंतर आता त्यांनी थेट ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
शिवसेना (उबाठा) आणि मनसे युतीबद्दल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या साद ला प्रतिसाद देत शिवसेना(उबाठा) पक्षप्रमुख यांनी महाराष्ट्र हितासाठी कार्यकर्त्यांच्या मनात जे आहे ते होणार असे म्हणून प्रतिसाद दिला आणि शिवसेना- मनसे युतीचे वारे वाहू लागले. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून साद- प्रतिसादचा सुरपाट्यांचा डाव सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक राज ठाकरे यांची भेट घेतली आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून शिवसेना (उबाठा) गट लक्ष करण्यात आला. दरम्यान, खासदार संजय राऊत आणि संदीप देशपांडे यांच्यात आरोप प्रत्यारोपा नंतर आता संदीप देशपांडे यांनी थेट शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरच टिकेची झोड उठवली आहे.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्याकडून मात्र त्यांना संयमित शब्दात प्रत्युत्तर देण्यासाठी प्रयत्न होत आहे. संदीप देशपांडे यांनी आज ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचे नाव घेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. भास्कर जाधव यांनी काही दविसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीनंतर ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. मुलाखतीत त्यांनी नेहमीप्रमाणे रोखठोक मते मांडल्याने त्यांच्या विधानांवरून ते नाराज असल्याची चर्चा पक्षात सुरू झाली. महाराष्ट्राच्या मनातलं ओळखणार्यानी आमदार भास्कर जाधव यांच्या मनातलं ओळखल का? असा सावाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.
मनसेसोबतच्या युतीवर भाष्य करतना उद्धव ठाकरे यांनी जे महाराष्ट्राच्या मनात आहे, लोकांच्या मनात आहे तेच होणार असल्याचे म्हटले होते. त्याचाच धागा पकडत देशपांडे यांनी हे ट्विट केले आहे. मागील काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा रंगली आहे. स्थानिक पातळीवरही कार्यकर्त्यांमध्ये संवाद वाढताना दिसत होता. मात्र, मनसेकडून आता शिवसेना (उबाठा) गटाला लक्ष करत टिकास्त्र सोडलं जात आहे. त्यामुळे दोन्ही पक्षात नेमकं चाललंय काय हे एक न उलगडणारं कोढं म्हणावं लागेल.
Comments