top of page

मनोज जरांगे पाटील यांना बैठकीसाठी पैसा कोण पुरवतं; लक्ष्मण हाकेंच्या आरोप आणि दावा

ree


मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मोठं आंदोलन उभारलं आहे. त्यांनी आरक्षण मागणीसाठी अनेकदा उपोषण देखील केली आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा मनेाज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक देत येत्या 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला आहे. या मार्चास राज्याभरातील लाखो मराठा बांधव मुंबईतील मार्चात सहभागी होणार आहेत. मागील मोर्चापेक्षा पाच पट अधिक संख्या मोर्चात सहभागी होणार असल्याचा दावाही जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात येत आहे.


दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर मनोज जरांगे पाटील हे गावा गावांमध्ये जाऊन मराठा बांधवांच्या भेटी घेत आहेत. गावागावात बैठका होत आहेत. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, यांच्याकडून आरोप प्रत्यारोपांना वेग आला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. जरांगे पाटील यांच्या या बैठका सरकार पुरस्कृत असल्याचं हाके यांनी म्हटलं आहे. दरम्यान यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शेक्यता आहे.


हाके म्हणले की, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज बीड जिल्ह्यातल्या मांजरसुंबा येथे निर्णय बैठकीवरून हाके यांनी जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जरांगेंच्या या बैठकीसह इतर बैठका या सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप हाके यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, ही राज्यकर्ते पुरस्कृत झुंडशाही आहे, जरांगेंना या बैठकांसाठी एका मतदारसंघातून आमदार 10 ते 15 लाख रुपये देतात, असा आरोपही हाके यांनी केला आहे.

यामुळेच मराठवाड्यातल्या छोट्या छोट्या गावातही मोठमोठी बॅनर्स आणि पोस्टर्स लागले आहेत.


ओबीसीमध्ये आरक्षण घेऊन मराठा समाजाला व्यवस्था हातात घ्यायची आहे. आरक्षणाच्या माध्यमातून नोकरशाहीमध्ये आपली लोकं घुसवायचा त्यांचा प्रयत्न आहे. यासंदर्भात महाराष्ट्रातील कोणत्याच नेतृत्वाकडून आता अपेक्षा नाही. त्यामुळे यासंदर्भात केंद्रातील ओबीसी नेत्यांना साकडे घालणार आहोत असंही यावेळी हाके म्हणाले. दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार आमोल मिटकरींवर हाकेंनी पुन्हा हल्लाबोल केला आहे. मिटकरी हे फार मोठे व्यक्ती नाहीत, असंही हाके यावेळी म्हणाले.


Comments


bottom of page