मराठवाड्यात इंधन टंचाई : पेट्रोल - डिझेलसाठी पंपावर रांगा, ट्रव्हल्सला मुबलक डिझेल?; शेतकर्यांची अडवणूक , पेरणीपूर्व मशागती खोळंबल्या!
- Navnath Yewale
- May 24
- 3 min read

अखाती देशातील युध्दामुळे देशात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर मराठवाड्यातील पेट्रोल पंपावर इंधनासाठी रांगा लागल्या आहेत. एकीकडे इंधन टंचाई निर्माण झाल्याने डिझेल अभावी शेतकर्यांच्या पेरणीपूर्व मशागती खोळंबल्या असल्या तरी दूसरीकडे मात्र ट्रव्हल्सला मात्र मुबलक इंधन पुरवठा केल्या जात असल्याने शेतकर्यांतून संताप व्यक्त होत आहे.
राज्यात सर्वत्र इंधन तुटवडा निर्माण झाल्याने ग्रामीण भागत ठिकठिकाणी पेट्रोल- डिझेलसाठी पंवावर रांगा पाहायला मिळत आहेत. मराठवाड्यासह विदर्भातही तीव्र इंधन टंचाई निर्माण झाली आहे. वाशिम जिल्ह्यात सलग तिसर्या दिवशी पेट्रोल पंपावर डिझेल मिळवण्यासठी शेतकर्यांनी रात्री पासून रांगा लावल्या आहेत. नवव्या दिवशी ही पेट्रोल पंपावर झिझेल नसल्याने शेतकरी आणि वाहनधारकांना रात्रभर जागून डिझेल मिळायची वाट पहावी लागली. बुलढण्यात अकराव्या दिवशी इंधन टंचाईच संकट गडद झाले आहे. मागणी आणि पुरवठ्याच्या तफावतीमुळे संकट अजून गडद होण्याचं चिन्ह दिसून येत आहे. पेरणीपूर्व मशागती इंधनाअभवी खोळंबल्याने शेतकर्यांतून संताप व्यक्त होत आहे.
मराठड्यातील संभाजीनगराच्या ग्रामीण भागांसह परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, जालना जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पंपावर शेतकरी गर्दी करत आहेत. परभणी जिल्ह्यातील वसमत तालुक्यात रविवारी (दि.24) शेतकर्यांनी पंपावर शेतकर्यांनी रांगा लावल्या. दरम्यान याच वेळी ट्रव्हल्सला डिझेल मिळाले पण शेतर्यांना डिझेल मिळाले नाही त्यामुळे शेतकर्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. जालना जिल्ह्यातील फुलंब्रीमध्ये शेतकरी नांगरणी, वखरणीसाठी ट्रॅक्टरला डिझेल अवश्यक असल्याने शेतकर्यांनी पंपावर रांगा लागवल्या. दुष्काळ पाचवीला असलेल्या मराठवाड्यात महिलांच्या पिण्याच्या पाण्यासाठी रांगा दिसून आल्या होत्या, मात्र आता डिझेलसाठी शेतकर्यांच्या पंपावर ड्रम घेवून रांगा दिसून येत आहेत.
सध्या खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर परेणीपूर्व मशागतीची कामे वेगात सुरू आहेत. दिवभर शेतामध्ये ट्रॅक्टरच्या साह्याने मशागतीची कामे करणारे शेतकरी आता रात्रभर पंपाबाहेर डिझेलच्या प्रतीक्षेत उभे असल्याचे चित्र मराठवाड्यात दिसून येत आहे. हिंगोली शहरातील पंपाबाहेरही मध्यरात्रीनंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. ट्रॅक्टर, मालवाहू वाहने, पिकअप आणि दुचाक्यांच्या रांगा पेट्रोल पंपाबाहेर लागल्याने अनेक गोंधळ होत आहेत.
जालन्यात 59 पेट्रोलपंप बंद : जालन्यात जिल्ह्यात इंधना अभावी 59 पेट्रोलपंप बंद आहेत. ज्या ठिकाणी इंधन उपलब्ध आहे त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी झाली आहे.याचा फटका सर्वसामान्य नागरीकांसह शेतकर्यांची गैरसोय होत आहे. जालना तालुक्यात सर्वाधिक 24 पेट्रोलपंप बंद असून यामुळे वाहनधारकांसह शेतकर्यांची गैरसोय होत आहे. तब्बल 59 पंपावरील साठा संपल्याने ज्याठिकाणी इंधन उपलब्ध आहे त्या ठिकाणी रांगाच रांगा पाहायला मिळत आहेत.
यांत्रिक शेतीने शेतकर्यांचे कंबरडे मोडले: इंधन टंचाईमुळे खरिप पेरणीपूर्व मशागती तर खोळंबल्याच पण, मशागतीचे भाव कडाडले आहेत. ट्रक्टरद्वारे नांगरणीसाठी 1500 रुपये एक्कराचा भाव यंदा इंधन टंचाईमुळे 2500 रुपये पोहचला आहे. पारंपारिक बैल शेतीला फाटा देत यांत्रिक शेतीचा मार्ग अवलंबणार्या शेतकर्यांचे यंदा इंधन टंचाईमुळे कंबरडे मोडले आहे.
शेतकरी रांगेत ट्रव्हल्स वाले मजेत: इंधन टंचाईमुळे शेतकरी दिवस रात्र रांगेत उभे असले तरी नांदेडमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे यांनी शहरातील एका पंपावर शेतकरी रांगेत असताना एका नामांकित ट्रव्हल्सला मुबलक डिझेल भरुन देताना रंगेहात पकडले. एका बाजूला शेतकर्यांना केवळ मर्यादीत डिझेल वाटप करणार्या पंपचालकाने ट्रव्हल्सला मात्र मुबलक डिझेल दिल्याचा संताप व्यक्त करत माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे यांनी जिल्हा पुरवठा अधिकार्यांपासून फोन लावून प्रकाराचा निषेध व्यक्त केला.
इंधन टंचाईला राजकीयझालर : राज्यातील इंधन टंचाईवर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी राज्यात इंधन टंचाई नसून केवळ काँग्रेसवालेच कृत्रिम इंधन टंचाईचा बनाव करत असल्याचे वक्तव्य केले होते. यावर शेतकर्यांनी संताप व्यक्त करत थेट मुख्यमंत्री फडणवीस, पंतप्रधान मोदी यांना इंधन टंचाईवर सवाल केले आहेत.
इंधनासाठी पंपावर मारामार: मराठवाड्यात शेती मशागतीच्या कामांना वेग आला असतानाच दूसरीकडे इंधन टंचाई निर्माण झाल्याने ट्रॅक्टर मालकांकडून शेतकर्यांना डिझेलची मागणी करण्यात येत असल्याने दिवसभर शेतात राबणारा शेतकरी पंपावर ड्रम घेवून रांगेत उभा असल्याचे चित्र आहे. पंपावर ड्रम ठेवण्यावरुन अनेक ठिकाणी राड्याच्या घटना घडत असताना आपसात मारामारीचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा सोसणार्या मराठवाड्याला यंदा इंधन टंचाईला समोरं जावं लागत आहे.



Comments