मराठा आंदोलक जरांगे पाटलांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा कुणबी प्रमाणपत्र गतीने वाटप, सातारा गॅझेट लागू करा अन्यथा जूनमध्ये आंदोलन
- Navnath Yewale
- Feb 25
- 2 min read

आंतरवाली: हैदराबाद गॅझेटिअर च्या जीआर नुसार कुणबी प्रमाणपत्र गतीने वाटप करण्यात यावे, जानिवपूर्वक प्रशासकीय अधिकारी प्रमाणपत्र वाटपात दिरंगाई करत असल्याचा आरोप करत तत्काळ सातारा संस्थानचं गॅझेट लागू करण्याची मागणी मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी केली. मंत्री विखे पाटील यांनी जीआर प्रमाणे प्रमाणपत्र वाटपासाठी परिपत्रक जारी करावं यासह इतर मागण्यांची तातडीने अंमलबजावीण करण्यात यावी अन्यथा जून मध्ये उपोषण करण्यात येईल. उपोषण करताना समाज मुंबईला येऊ शकतो असा गर्भित इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटिअर नुसार प्रमाणपत्र वाटपासाठी छत्रपती संभाजीनगर आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन केली आहे. त्याअणुषंगाने बुधवारी (दि.25) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत सरकारला इशारा दिला.
मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनादरम्यान मराठा आरक्षण उपसमीतीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठवाड्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्यासाठी हैदराबाद गॅझेटिअर चा जीआर काढला. त्याच वेळी सातारा संस्थान, कोल्हापूर, औंध संस्थानच्या गैझेटिअरचे अश्वासन दिले होते. त्यामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाचा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याच्या भावना उमटल्या होत्या. मात्र, मागील सहा महिन्यात कुणबी प्रमाणपत्र वाटपाची आकडेवारी केवळ दोन अंकात आल्याने जरांगे पाटलांनी संताप व्यक्त केला.
माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले की, सहा महिन्यापूर्वी हैदराबाद गॅझेटिअरचा जीआर काढला अद्याप पर्यंत प्रमाणपत्र वाटपास कसल्याही प्रकारची गती मिळालेली नाही. प्रशासकीय अधिकार्यांची उदाशीनता व दिरंगाईमुळे कुणबी प्रमाणपत्र वाटपाला खिळ बसल्याचा आरोप त्यांनी केला. गॅझेटिअरनुसार स्थानिक चौकशी अहवाला प्रमाणे अर्ज केलेल्यांना अद्याप प्रमाणपत्र वाट करण्यात आले नाहीत.
अधिकारी का देत नाही? मंत्री तथा समितीचे अध्यक्ष विखे पाटील यांनी प्रशासनातील जानिवपूर्वक दिरंगाई करणार्या प्रशासनातील अधिकार्यांवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्याचे परिपत्रक जारी करावे. कारण त्यांच्यावर समाजाने मोठा विश्वास टाकला आहे. समाजाला आशा आहे मंत्री विखे पाटील यांनी जीआर काढला, त्यांना मोठी आशा आहे. त्यामुळे विखे पाटलांनी अश्वासीत केलेल्या मागण्यांची आंमलबजाणी करावी असंही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, विखे पाटील तुम्ही सरकारची भूमिका बजावता, मराठा समाजाची भूमिका बजावता, मराठा आरक्षण विरोधकांची भूमिका बजावता हे चालणार नाही. आरक्षण लढ्यात बलिदान दिलेल्या कुटुंबीयांच्या नोकरीचा प्रश्न,
गुन्हे मागे घेण्याचा प्रश्न, विद्यार्थ्यांना सारथी अंतर्गत योजनांचा प्रश्न, विदेशी शिष्यवृत्तीचा प्रश्न अशा मागण्या अद्याप जशास तश्या आहेत. समाजाच्या विश्वासाला तडा जाऊ देवू नका असा अन्यथा मला जून मध्ये पुन्हा उपोषण करावे लागेल. आणि हाच मराठा उपोषण करताना मुंबईला सुद्धा येऊ शकतो असा इशाराही जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.



Comments