top of page

मराठा आरक्षण जीआर विरोधात कोकणाती कुणबींचा आझाद मैदावर मोर्चा

ree

मराठा समाजास ओबीसी मधून आरक्षणा विरोधात आज कुणबी संघाच्या वतिने मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील कुणबी समाच्या वतिने आझाद मैदानात मोर्चा काढण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष अनिल नवगने यांच्या अध्यक्षतेखाली हा मोर्चा काढण्यात आला. आमच्या आरक्षणात मराठा मराठा समाजाला घुसवलं जात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या दबावाखाली काढलेला जीआर रद्द करावा अशी मागणी आंदोलकांनी केली.


ओबीसी आरक्षण बचाव मोर्चासाठी मुंबई संघाचे अध्यक्ष अनिल नवगणे, उपाध्यक्ष शंकरराव म्हसकर यांनी 9 ऑक्टोबर रोजी होणार्‍या मोर्चात सहभागी होण्याचे सात जिल्ह्यातील कुणबी समाजास आवाहन केले होते. या पार्श्वभूमिवर आज कुणबी आंदोलक मोठ्या संख्येन आझाद मैदानात जमले होते. ‘ आमची सरकारकडे फार मोठी मागणी नाही. मराठा समाजाला कुणबी आरक्षणात घुसवले जात आहे. सरकारने हैदराबाद गॅझेटिअरबाबत काढलेला अध्यादेश मागे घ्यावा. आम्ही शांततेत मागणी करत आहोत. पण सरकारने वेळीच निर्णय घेतला नाही तर समाज आक्रमक होईल, असा इशरातच या आंदोलकांनी सरकारला यावेळी दिला आहे.


दरम्यान, जन्माने आणि कर्माने कुणबी असलेल्या कुणबी समाजाच्या वतीने सरकारकडून होत असलेल्या अन्याय विरोधात आझाद मैदानावर हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनासाठी बुधवारपासून प्रमुख पदाधिकारी यांच्या गाड्यांचे ताफे आझाद मैदानाकडे जय्यत तयारीसाठी निघाले होते. कायदा आणि सुव्यवस्थेच्या सूचना देखील आंदोलनात सहभागी होणार्‍या प्रत्येक समाज बांधव यांना सात जिल्ह्यातील तालुका स्थरावर तसेच प्रत्येक विभाग ग्रूपमध्ये बैठका घेऊन देण्यात आल्या होत्या.


आझाद मैदानामध्ये आंदोलकांना जोरदार घोषणाबाजी करत मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आगामी काळात तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला.


“ संघर्षासाठी कुणबी समाजाच्या वतीने एकजुटीचा निर्धार करण्यात आला असून आज आझाद मैदानावर होत असलेले आंदोलन हे ना भूतो ना भविष्य असे ठरले आहे. मराठा समाजाला शासनाने दिलेले आरक्षणास कुणबी समाजासह ओबीसींचा तीव्र विरोध आहे. आणि सरकारने त्वरित तो जीआर रद्द करावा, अशी प्रमुख मागणीसाठी आझाद मैदानावर हा मोर्चा काढण्यात आला.”

अनिल नवगणे अध्यक्ष, कुणबी समाजोन्नती संघ मुंबई


“ ओबीसी विद्यार्थाना 100 टक्के शिष्यवृत्ती मिळालीच पाहिजे जातिनिहाय जनगणना झालीच पाहिजे. शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळास स्वतंत्र दर्जा देवून त्यास पंधराशे कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतूद शासनाने लवकरात लवकर करावी, लोकनेते शामराव पेजे न्यायासाठी सरकाने 50 कोटीचा निधी उपलब्ध करून द्यावा, आदी मागण्यांसह जन्माने आणि कर्माने कुणबी असून ते आर्थिक दृष्ट्या मागास आहेत. जातीचा दाखला शासनाच्या काही जाचक अटीशर्तीमुळे मिळत नसल्याने मुलाबाळांचे मोठं नुकसान होत आहे. हा जनाक्रोष मोर्चा सरकारला जागे कण्यासाठी आझाद मैदानावर काढण्यात आला आहे.

शंकरराव म्हसकर, उपाध्यक्ष

Comments


bottom of page