top of page

मराठा आरक्षण पुन्हा सरकारला घाम फोडणार!; 29 ऑगस्टची जोरदार तयारी


मराठा आंदोलन जरांगे पाटील यांनी मागण्यावर ठाम राहून 29 ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारला सप्टेंबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर मराठा आरक्षण आंदोलन सरकारसाठी डोके दुखी ठरणार आहे.


राज्यात मराठा समाजास ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील दोन वर्षापासून आंदोलनाद्वारे संघर्ष करत आहेत. आंतरवली सराटी येथे उपोषणा नंतर मनोज जरांगे पाटील यांनी तत्कालीन शिंदे सरकारला घाम फोडला होता. परिणामी शिंदे सरकारने जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार मराठा आरक्षणासाठी पुराव्याची जंत्री शोधण्यासाठी माजी न्यायमुर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापन केली.


शिंदे समितीने राज्यात जिल्हा, तालुका निहाय नोंदी शोधण्यासाठी कक्ष स्थापन केले. सुरुवातीच्या काळात राज्यभरात नमुना नं.14, 32,33 च्या माध्यमातून मोडी लिपी, मराठी भाषेत पूर्वजांच्या कुणबी म्हणून जवळपास 52 लाख नोंदी शोधल्या. त्याअणुषंगांने बहूतांश ओबीसी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. मात्र मराठा- कुणबी एकच असल्याने राज्यभरातील मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याच्या मागणीवर ठाम राहून जरांगे पाटील यांनी 24 जानेवारी रोजी मुंबईकडे मोर्चा काढला.

वाशी मध्ये मोर्चा पोहोचताच शिंदे सरकारकडून सगेसोयरे अध्यादेश काढण्यात आला. त्यानुसार जरांगे पाटील यांनी अंदोलन स्थागित केले. मात्र अंमलबजाणी अभावी सगेसोयरे अध्यादेश केवह अध्यादेशच राहिला आणि विधानसभा निवडणुका झाल्या. महायुती सरकार स्थापने नंतर जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण अस्त्र उपसले. महायुती सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमदार सुरेश धस यांनी मध्यस्थि करत अंमलबजाणीसाठी तीन महिण्याचा कालावधी घेऊन जरांगे पाटलांचे उपोषण सोडले. मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्याने जरांगे पाटलांनी 29 ऑगस्टला पुन्हा मुंबई जाम करण्याचा इशार दिला आहे. त्यातच आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारला सप्टेंबर महिण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे आगामी काळातील निवडणुका आणि जरांगे पाटलांचे निवडणुकांच्या तोंडावरील आंदोलन सरकारची डोके दुखी वाढवणारं आहे.


आता माघार नाही असे, मागण्या पदरात पडल्या शिवाय मुंबई सोडायची नाही असे म्हणत जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टच्या मोर्चाची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्याअणुषंगाने जरांगे पाटील यांनी (29 जून) रोजी आंतरवाली सराटी येथे राज्यव्यापी बैठक बोलावली आहे. दरम्यान, या बैठकीसाठी राज्यभरात गाव बैठका, प्रवासासाठी नियोजन,वाहनांची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारीस लागलेल्या महायुती सरकारपुढे पुन्हा मराठा आरक्षणाचा पेच निर्माण झाला असून ऐन निवडणुकीच्या तोंडावरील जरांगे पाटलांचे आंदोलन सरकारसाठी डोके दुखी ठरणार हे निश्चित.

Comments


bottom of page