मराठा आरक्षण : शिंदे समितीचा चौथा अहवाल सरकारला सादर; पुढील आंदोलनाची दिशा आज ठरवणार
- Navnath Yewale
- Apr 30
- 1 min read
जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने गाठला पहिला यशाचा टप्पा

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या रेट्याने मागील शिंदे सरकारने निवृत्त न्यायाधिश संदिप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नोंदी शोधण्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. आंदोलकांच्या मागण्यानुसार शिंदे समितीने आपला चौथा अहवाल सादर केला आहे.
त्यानुसार राज्यात 58 लाख, 82 हजार 385 नोंदी सापडल्या असून याच दोन कोटी मराठा कुटुंबीयांना लाभ होणार असल्याचे नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने पहिल्या टप्यातील यश गाठले आहे. दरम्यान, राज्यातील मराठा समाजाला सरसकट आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आज निर्णायक बैठकीद्वारे पुढील दिशा ठरवणार आहेत.
गेल्या पाच दशकांपासून राज्यात मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे. आण्णासाहेब पाटील, आण्णासाहेब जावळे पाटील, विनायकराव मेटे यांच्यापासून तर आता मनोज जरांगे इथपर्यंतच्या आरक्षण आंदोलनाला मोठा इतिहास आहे. लाखोंच्या मुक मोर्चा नंतर आंदोलनाला धार आली ती मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाने, राज्यातील मराठा समाजास सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली (सराटी) येथे अंदोलनावर लाठीचार्ज झाला, आणि आंदोलनाला कलाटणी मिळाली.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी अहिंसेच्या मार्गाने उभारलेल्या आंदोलनाला राज्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला याचे फलित तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या मागासलेपण सिद्ध करण्यासाठी मराठा समाजाचा सर्वे केला. दरम्यान, मराठा कुणबी एकच असल्याचे पुरावे शोधण्यासाठी निवृत्त न्यायमुर्ती संदिप शिंदे समिती गठीत करण्यात आली. ज्यामुळे स्वातंत्र्य पूर्व काळातील महसुली पुरावे शोधण्यात आले. ज्यामध्ये राज्यभरातील सहा महसूली विभागामध्ये एकून 58 लाख 82 हजार 385 नोंदी शोधण्यात आल्या. यामध्ये सर्वाधिक अमरावती विभागामध्ये 2574369 नोंदी मिळाल्या. तर सर्वात कमी 47795 छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये अढळल्या आहे. त्यानुसार राज्यभरात 8 लाख 25हजार 851 जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. हे केवळ मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा परिपाक म्हणावं लागेल.
कोणत्या विभागात किती नोंदी
अमरावती -2574369
कोकण -925247
पुणे-72513
नागपूर-94976
नाशिक 827465
छत्रपती संभाजीगर 47795
Comentários