top of page

मराठा मोर्चाचा मुंबईत ठाकरे बंधूंना पाठिंबा, जरांगे पाटीलांचे पोस्टद्वारे अवाहन

जालना: महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. मतदान अवघ्या दोन दिवसांवर आलं आहे . त्याआधी मुंबईतील राजकीय वातावरण जास्तच तापलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर जबरदस्त वातावरण नर्मिती झाली आहे. ठाकरे बंधूच्या सभेनंतर भाजपच्या नेत्यांकडून टीकेची झोड सुरू आहे. मुंबई महापालिकेवर सत्ता कुणाची येणार अशी चर्चा सुरू झाली असतानाच, निवडणुकीसाठी मुंबईत मराठा मोर्चानं ठकारे बंधूंना पाठिंबा जाहीर केला आहे.


मुंबईत मराठा बांधव हे ठाकरे बंधूंना मतदान करण्यासाठी आवाहन करणार आहेत. मराठा आंदोलनक मनोज जरांगे यांनी पोस्टद्वारे आवाहन केले आहे. मुंबई ही ठाकरे यांच्यात हातात शोभून दिसणार, असं पोस्टर मराठा मोर्चानं प्रसिद्ध केलं आहे. जरांगे पाटील यांनी आवाहन केल्यानंतर मराठा मोर्चानं ठकारे बंधूंना मुंबईत पाठिंबा दिला आहे.

Comments


bottom of page