मला प्रेमाच्या जाळ्यात ओढणार्याला 20 कोटीची ऑफर
- Navnath Yewale
- Apr 6
- 1 min read
Updated: Apr 8
करुणा मुंडे यांचे धनंजय मुंडे यांच्यावर धक्कादायक आरोप

मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्न करणार्याला दोन कोटी रुपयांची ऑफर धनंजय मुंडे आणि त्याच्या दलाल लोकांकडून देण्याचा धक्कादायक आरोप करुण मुंडे यांनी केला आहे. मला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी दलाल लोक कुणालतरी राजी करण्याकरीता दलाली करीत होते. असं म्हणत करुणा मुंडेनी त्या कथीत दलालांची नावेदेखील घेतली आहेत.
करुणा मुंडे म्हणाल्या की, राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे, तेजस ठक्कर हे धनंजय मुंडेसाठी दलाली करतात. मला प्रेमात अडकवून लग्न करणार्याला 20 कोटी रुपये हेच दलाल लोक देणार होते. ही दलाल टीम धनंजय मुंडेना मुली पुरवतात, दारुही पुरवतात या दलालांमुळेच धनंजय मुंडवर घरात बसण्याची वेळ आली आहे. 27 वर्षे मी धनंजय मुंडेचा मुलासारखा सांभाळ केला, पतीसारखं नाही मुलासारखं सांभाळलं आहे.
आज त्यानेच मला रस्त्यावर आनलं. आज केवळ मी त्यांची गाडी आणली तर गदारोळ केला. धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आपणच आहेत, हे सिद्ध करण्यासाठी करुणा मुंडे यांची न्यायालयीन लडढाई सुरु आहे. धनंजय मुंडे मात्र, त्यांना पत्नी मानायला तयार नाहीत. आम्ही लिव्ह-इन- रिलेशनशीपमध्ये होतो, असा दावा ते करतात तर करुणा मुंडे असल्याचे सांगत आहेत. तसे पुरावेही करुणा मुंडे यांनी मा. न्यायालयासमोर मांडले आहेत. त्याच पुराव्यानुसार मा.जिल्हा सत्र न्यायालयाने धनंजय मुंडे यांची याचीका फेटाळली आहे.
Comments