top of page

महंत नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखन


ree


भगवाऩ गडाचे महंत नामदेव शास़्त्री यांनी पुन्हा माजी मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. भगवान गडाचे म्हणून धनंजय मुंडे यांना जाहीर केले आहे. संत भगवान बाबा गडाचा नारळी साप्ताहाची सांगता शिरुर कासार तालुक्यातील पिंपळनेर येथे संपन्न झाला.


कार्यक्रमासाठी धनंजय मुंडे या कार्यक्रमाला येणार होते, मात्र त्यांना हेलिकॉप्टरच्या उड्डाणास काही तांत्रिक अडचणी आल्याने त्यांचा दौरा रद्द केला, असे स्वत: नामदेव शास्त्री यांनी सांगितलं. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याकडून पुन्हा धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्यात आली.


भगवान गडाचे म्हणून धनंजय मुंडे यांना जाहिर केले आहे.. म्हणून तुम्ही त्याच टेन्शन घेऊ नका.. मोठा कार्यक्रम करू आपण.. त्यांच्या गाालावरून वारे गेले आहे.. सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा चांगली वाणी बंद पडली आहे ती पुन्हा सुरू व्हावी.. पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाजकल्याण त्यांच्याकडून घडाव एवढेच बोलू.. असेही नाबदेव शास्त्री म्हणाले.


भगवान गडाचा नारळी साप्ताहाची सांगता सोहळ्या प्रसंगी भगवान गडाचे मठाधिपती महंत नामदेव शास्त्री म्हणाले की, बीडचे भूमिपुत्र धनंजय मुंडे आज आपल्या कार्यक्रमाला येणार होते मात्र त्यांना हेलिकॉप्टरचा क्लिअरन्स मिळाला नाही म्हणून त्यांचा दौरा रद्द झाला आहे, असं कारण नामदेव शास्त्री यांनी सांगितलं. दोन तास हेलिकॉप्टरची परवानगी मिळाली नसल्याचंही शास्त्री म्हणाले.

Comments


bottom of page