top of page

महादेव मुंडे हत्या प्रकरण; भोपळा, कन्हेरवाडी ग्रामस्थांचे रास्तारोको

Updated: Jul 26

ज्ञाणेश्वरी मुंडे, मुलांना रडू कोसळले, धनंजय देशमुख, बाळा बांगरही सहभागी


ree

महादेव मुंडे यांच्या क्रुर हत्या प्रकरणातील आरोपींच्या अटकेसह इतर मागण्यांसाठी ज्ञाणेश्वरी मुंडे यांच्या माहेर असलेल्या कन्हेरवाडी, व सासर भोपळा (ता.परळी) ग्रामस्थांनी आज पडत्या पावसात रास्ता रोको केला. ग्रामस्थांच्या रास्तारोकोमुळे आंबाजोगाईवरून परळीकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती.


परळी येथील व्यवसायीक महादेव मुंडे यांची 18 महिण्यापूर्वी निर्घुन हत्या करण्यात आली होती. महादेव मुंडे यांच्या मारेकर्‍यांना अटक करण्यात यावी, तपासासाठी एसआयटी स्थापन करावीयासह इतर मागण्यांसाठी ज्ञाणेश्वरी मुंडे यांचे माहेर कन्हेरवाडी व सासर भोपळा ग्रामस्थांच्या वतिने रास्तारोको आंदोलनाचे आयोजन करण्यत आले होते. संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख, बाळा बांगर, राजाभाऊ फड यांच्यासह ज्ञाणेश्वरी मुंडे कुटुंबासह सहभागी झाल्या होत्या.

ree

परळी येथील तहसील कार्यालयासमोर झालेल्या क्रूर हत्येचा तपास बंगल्यावरून फोन आल्याने थांबवल्याचा आरोप ज्ञाणेश्वरी मुंडे यांनी केला आहे. दरम्यान, ज्ञाणेश्वरी मुंडे यांनी न्यायासाठी प्रशासनाचे उंबरे झिवले. मस्साजोगचे सरपंच संताष देशमुख यांच्या हत्ये नंतर आमदार सुरशे धस यांनी सभागृहात महादेव मुंडे हत्तेचा प्रश्न उपस्थित केला होता.


त्यानंतर बाळा बांगर यांनी या हत्येचे धक्कादाय खुलासे करत थेट आरोपींचे नावंच जाहिर केले. वाल्मीक कराड, श्री कराड, भावड्या कराड, गोट्या गित्ते यांनी महादेव मुंडे यांची हत्या केल्याचा दावा बाळा बांगर यांनी केला. शिवाय महादेव मुंडे याच्या मासांचा तुकडा वाल्मीक कराडला दाखवण्यासाठी आठ दिवस गोट्या गित्ते सोबत घेवून वावरत असल्याचा धक्कादायक खुलासाही बाळा बांगर यांनी केला आहे.


दरम्यान बाळा बांगर यांनी महादेव मुंडे प्रकरणात धक्कादायक खुलासे केल्यापासून खर्‍या अर्थाने महदेव मुंडे हत्या प्रकरणाला वाचा फुटली. ज्ञाणेश्वरी मुंडे यांनी पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या आवारातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. जरांगे पाटील यांनीही ज्ञाणेश्वरी मुंडे यांची कुटुंबासह भेट घेवून न्याय मिळवून देण्याचे अश्वासन दिले.


बाळा बांगर यांनी महादेव मुंडे याच्या हत्तेचे फोटो पत्रकार परिषदेत समोर आणल्यानंतर ज्ञाणेश्वरी मुंडे यांनी पुन्हा जरांगे पाटलांची भेट घेत शवविच्छेदन अहवालासह इतर पुरावे जरांगे पाटलांना दिले. त्यानंतर बाळा बांगर यांनीही जरांगे पाटलांची भेट घेवून महादेव मुंडे यांच्या हत्तेचे सर्व पुरावे जरांगे पाटलांना दिले. महादवे मुंडे यांच्या मारोकर्‍यांना तात्काळ अटक करून एसआयटी मार्फत तपास व इतर मागण्यांसाठी भोपळा व कन्हेरवाडी ग्रामस्थांनी आज भर पावसात रास्ता रोको केला. यावेळी परळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षकांनी आंदोलन कर्त्यांचे निवेदन स्वीकारून कारवाईस्तव वरिष्ठांकडे पाठवल्याचे सांगितले त्यानंतर आंदोलन स्थागित करण्यात आले.

Comments


bottom of page