महापालिकां निवडणुक: बंडखोर कोणाचा खेळ बिघडवणार?

मुंबई: महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. सर्व राजकीय पक्षांमध्ये तिकीट न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी उफाळून आल्याचे दिसून आले. यात भाजपमधल्या नाराजांची संख्या अधिक होती. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नाराज कार्यकर्त्यांना फोन करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला, यातल्या बहुतेकांनी त्यांचे उमेदवारी अर्ज घेतले. पण काही ठिकाणी नाराज मागे हटले नाहीत, त्यामुळे आता निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे.
मुंबईमध्ये आधी भाजपचे 20 बंडखोर उभे होते, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शिष्टार्इृला यश आलं आणि 14 बंडखोरांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. पण 6 बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. तर संभाजीनगरमध्ये भाजपच्या तब्बल 69 बंडखोरांनी अर्ज दाखल केले होते. यातल्या 54 जणांनी अर्ज मागे घेतल्यामुळे आता 15 बंडखोर निवडणुक रिंगणात आहेत. नागपूरमध्ये 15 पैकी 6 जणांनी अर्ज मागे घेतले असून 9 बंडखोर निवडणुक लढवण्यावर ठाम राहीले. दरम्यान मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 7 बंडखोर उमेदवार कायम आहेत.
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसांठी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. शेवटच्या दिवसी प्राप्त झालेल्या माहितीनुसार भाजपचे 44 आणि शिवसेनेचे 19 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. राज्यातल्या सर्व महापालिका निवडणुकींसाठी प्रचाराला आता शनिवारपासून सुरूवात होणार आहे. 15 जानेवारीला या निवडणुकांचं मतदान पार पडेल तर 16 जानेवारीला निकाल लागणार आहेत.



Comments