top of page

महाबळेश्वरच्या पुरातन विहीरीत इतिहास गवसला, शिवकालीन ठेव्याशी सामर्थ्य!


महाबळेश्वरच्याा एका विहिरीत ब्रिटीशांच्या नजरेत येऊ नये म्हणून लपवलेली काही ए—ेतिहासिक पुरातन शस्त्रे सापडली आहेत. महाबळेश्वरच्या एका कोरड्या विहिरीत पुरातत्व खात्याला इतिहास गवसला आहे. “मराठा धोप” या पद्धतीच्या या दुर्मिळ तलवारी अतिशय महत्वाच्या आहेत. ‘इंडियन आर्म्स ऍक्टनंतर ब्रिटीशांनी’ अनेक शस्त्रे जप्त करुन टाकली. त्यातली शिवकालीन धाटणीची शस्त्रे असल्याचे सांगितले जात आहे. या शस्त्रांमध्ये मराठा धोप प्रकारच्या तलवारीची मूठ, इतर पुरातन वस्तु सापडले आहेत.


मराठा युद्धनिती व शस्त्रांच्या अभ्यासात धूप तलवारी या उत्कृष्ट पोलाद दर्जासाठी प्रसिद्ध होत्या. त्यामुळे या तलवारींसाठी फ्रेंच पोर्तुगीज या देशातील बनावटीचे पाते वापरत असल्यामुळे या तलवारींना फिरंंगी देखील म्हटले जात असे, या तलवारीमध्ये धोप आणि वक्र असे दोन उपप्रकार आहेत. 3 मे 2025 रोजी महाबळेश्वर येथील ऐतिहासिक व पुरातन वस्तूंचा अभ्यास करताना इतिहास अभ्यासक मुयरेश मोरे व सथानिक जाणकार राहुल कदम यांना या वस्तू निदर्शनास आल्या.


विशिष्ट पद्धतीने बनवण्यात आलेल्या तलवारी :

शत्रूंला भोसकण्यासाठी वक्र आणि धोप प्रकारच्या तलवारींचा वापर केला जात. वक्र आणि धोप या तलवारी घोडदळासाठी वापरल्या जात असत. त्याची लांबी 4 फूट असत. या फिरंगी पात्यांना मराठ्यांनी युद्धामध्ये जास्त काळ टिकण्यासाठी व हाताला इजा होऊ नये अशा प्रकारे या तलवारींची मूठ बनवली जात असे. या तलवारींचा समतोल उत्तम असल्यामुळे या तलवारी अभ्यासाठी महत्वाच्या ठरणार असल्याची माहिती मयुरेश मोरे यांनी दिली. दरम्यान, महाबळेश्वरमध्ये या तलवारी सापडल्यांनतर स्थानिकांनी व अभ्यासकांनी ही माहिती गावातील प्रमुख व्यक्तींना दिली. त्यानंतर उपविभागगिय अधिकारी तसेच तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रविण शिंदे, तसेच सातार्‍याचे युवा ट्रेकर्स जयवंत बिरामणे आणि संपूर्ण टीमने या ऐतिहासिक वस्तू विहिरीतून बाहेर वाढल्या.


मराठा काळातील धोप पद्धतीच्या तलवारी ऐतिहासिक दृष्टिकोनातून अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान मानल्या जातात. इंग्रजांनी भारतीय शस्त्रास्त्र कायदा लागू केल्यानंतर अनेक पारंपारिक शस्त्रे ताब्यात घेऊन नष्ट केली. मात्र काही शस्त्र अशा कारवायांमधून वाचली आणि तीच आज ऐतिहासिक ठेव्याचे रुप घेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रसिद्ध ‘ जगदंबा’ आणि ‘ भवानी’ या तलवारींसारख्या प्रकारात धोप तलवारी मोडतात. मराठा सैनिकी रणनीती आणि शस्त्रांस्त्रांचा अभ्यास करुन अशा तलवारी घडवल्या गेल्या.


Comments


bottom of page