top of page

महायुतीत अंतर्गत धुसपूस !




देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या कालच्या दौर्‍यात महायुतीमधील अंतर्गत धुसपूस समोर आली. अमित शाह यांची सुनिल तटकरे यांच्या निवास्थानी खान-पानाच्या व्यवस्थेवरून शिवसेना (शिंदेगट) ची त्रेधा उडाली. रायगड, नाशिक पालकमंत्रीपदाचा तिढा असो वा निधी वाटपात दुजाभाव विषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यावर अजित पवार यांनी शिंदे आणि आपले चांगले संबंध असल्याचे सांगत सारवा सारवीचा प्रयत्न केला असला तरी महायुतीमधील अंतर्गत धुसपूस यानिमित्ताने समोर आली.


महाविकास आघाडी सरकारच्या काळात वित्त खातं अजित पवार यांच्याकडेच होतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेना मंत्री, आमदारांना निधीवाटपात समातोल रखला जात नसल्याचा आरोप त्यावेळेस एकनाथ शिंदे समर्थक आमदार मंत्र्याकडून झाले होते. एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला रामराम ठोकून महायुतीत प्रवेशाला निधीवाटपाचंही एक कारण होतं.



महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अजित पवार यांनीही महायुतीत प्रवेश केला. या निमीत्ताने राज्याला देवेंद्र फडणवीस व अजित पवार असे दोन मुख्यमंत्री मिळाले. त्यानुसार अजित पवार यांच्याकडे वित्त खातं देण्यात आलं पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जमेची बाजू होती.


2024 च्या सार्वत्रीक विधानसभा निवडणूकीत महायुतीला एकतर्फी बहूमत मिळाल्यानं सहाजकीच भाजप सह मित्रपक्षांना संख्याबळा प्रमाणे मंत्रीमंळात स्थान मिळलं. पण त्यातही खाते वाटपावरुन महायुतीत रस्सीखेच पहायला मिळाली. उपमुख्यमंत्री असतानाचे गृहखात स्वत: ठेवण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले. एकनाथ शिंदे यांनी अर्थ, वित्त खात्यासाठी अग्रह धरला.


मात्र, अजित पवार यांनाही अर्थ, वित्त खात्याचा मोह कायम राहिल्याने एकनाथ शिंदे यांना प्रसंगी एक पाऊल मागे घ्यावा लागला तसा शिवसेनेच प्रवक्ते संजय सिरसाठ यांनी बोलून दाखवले होते. सहाजीकच संख्याबळा प्रमाणे पालकमंत्री पदावर दावे करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांच्या निवडी करण्यात आल्या. मात्र, नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच तिढा कायम आहे.


रायगड आणि नाशिक पालकमंत्रीपदावर शिवसेना (शिंदेगट) यांचा दावा कायम असल्याने रायगडमध्ये सुनिल तटकरे तर नाशिक मध्ये माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिष्ठेचा विषय निर्माण झाल्याने राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडून दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर दावा करण्यात आला आहे. त्यातच काल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुन्यतिथी निमित्त देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या रायगड दौर्‍या प्रसंगी सुनिल तटकरे यांच्या निवास्थानी खान-पानची व्यवस्था शिवसेना (शिंदे गट) ला रुचलेली नाही.


त्यामुळेच रागडावरील भाषणात अजित पवार यांना डावलून काहीसे नाराज एकनाथ शिंदे यांना संधी देवून कुरवाळण्याचा प्रयत्न झाला. मात्र, एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे शिवसेना (शिंदे गट) मंत्री, आमदारांना निधी वाटपात दूजाभाव, मंत्री आमदारांची कामे वित्त विभागात खोळंबली जातात यासह इतर तक्रारीचा पाढा वाचला त्यामुळे महायुतीतील अंतर्गत धुसपूस समोर आली.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले आणि एकनाथ शिंदे यांचे संबध चांगले आहेत त्यांना तसं काही वाटलं तर ते मला थेट बोलतील, अमित शाह यांच्याकडे तशी काही मागणी करणार नाहीत म्हणत सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला. या घडामोडींवर आद्याप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चकार शब्दही काढलेला नाही हे महत्वाचे आहे.

Comments


bottom of page