top of page

महायुती सरकारमध्ये फडणवीस, अजित दादा विरुद्ध एकनाथ शिंदे असा छुपा संघर्ष?

एका पाठोपाठच्या ‘या’ घटनांमुळे संशय बळावला




राज्यात महायुती सरकार सत्तेत येऊन चार महिने झाले आहेत. या सरकारकडे मोठे बहूमत असल्याने सध्यातरी स्थिर आहे. मात्र, महायुतीमध्ये भाजप,एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस असे तिन घटकपक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे येत्या काळात तिन पक्ष एकत्रीत राहने महत्वाचे आहे. पण गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील नाराजी उघडपणे जानवत आहे. सुरवाती पासूनच एकनाथ शिंदे नाराज आहेत.


तर दूसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार विरुद्ध एकनाथ शिंदे असे समिकरण जानवत आहे. ते समिकरण सत्ता स्थापन होऊन चार महिने झाले तरी प्रकर्षाने जानवत आहे. नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दौर्‍यावेळी हे सुक्ष्मपण लक्षवेधी राजकीय समिकरण स्पष्टपणे जानवत होतं. महायुती सरकार स्थापन झाल्या नंतर सुरवातीच्या काळातच मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने एकनाथ शिंदे नाराज होते.या नाराजीतूनच ते काही काळ सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे गावी गेले होते.



त्यानंतर शिंदेची नाराजी दूर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महायुतीमध्ये भाजप नंतर शिंदेच्या शिवसेनचे संख्याबळ आहे त्यामुळे संख्याबळानुसार मंत्रीपदे मिळावीत यासाठी अजित पवार विरुद्ध एकनाथ शिंदे असा वाद पहावयास मिळाला. यावरही तोडगा काढण्यात आला त्यानंतर या तिनही पक्षात मलईदार खात्यावरुन रस्सीखेच पहावयास मिळाली. त्यांनंतरही भाजप, शिवसेना(शिंदेगट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात सत्तावाटपांवरुन स्पष्ट संघर्ष दिसला.


विशेषत: रायगड व नाशिकच्या पालकमंत्रीपदावर गेल्या तिन महिण्यापासून स्थगिती दिली आहे. यावरुन तिनही पक्ष आमने-सामने आले आहेत. सत्तास्थाने नंतर शिंदेगटाचे आमदार वारंवार नाराजी दर्शवतात की, त्यांना राज्यसरकारमध्ये अपेक्षीत वजन मिळत नाही विशेषत: त्यांना निधी मिळत नसल्याचे मतदारसंघात नाराजीला सामोरे जावे लागते, अशी त्यांची तक्रार आहे.


तर दूसरीकडे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गट सत्तेतील वाटा वाढविण्याच्या प्रयत्नात आहे, त्यामुळे शिंदे गट अस्वस्थ दिसत आहे. महायुती सरकारकडून आयोजीत करण्यात आलेल्या अनेक राजकिय कार्यक्रमातील उपस्थित फरक जानवत आहे. अनेकवेळा भाजप व अजित पवार गटाचे कार्यक्रम एकत्र दिसतात, तर शिंदे गट वेगळा दिसतो. हा सर्वघटनाक्रम जानवतो.



या सर्व बाबींमुळे माध्यमांध्ये यावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे. दूसरीकडे महायुतीमध्ये तिन पक्ष एकत्रीत असले तरी त्यांना स्वत:चे पक्ष वाढविण्याचाा पूर्ण अधिकार आहे. त्यामध्ये भाजप मोठा भाग ठेवू पाहत आहे, तर शिंदे आणि अजित पवार दोघेही आपआपली ताकद वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत. फडणवीस हे स्पष्टपणे पहिल्या क्रमांकाचे नेतृत्व म्हणून राहिले आहेत, परंतु एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यामध्ये दूसर्‍या क्रमांकासाठी रस्सीखेच आहे. निधी वाटपाच्या मुद्यावरुन शिंदेगट नाराज आहे.


अजित पवार यांच्या अर्थ खात्याकडून कमी निधी दिल्या जात असल्याने शिंदे गटाचे आमदार वारंवार तक्रार करतात की, त्यांच्या मतदार संघाना अपेक्षीत निधी मिळत नाही. काही आमदारांनी तर माध्यमांकडे किंवा पक्षांतर्गत बैठकीत ही नाराजी व्यक्त केली आहे. विशेषत: अजित पवार गटाच्या आमदारांना अधिक निधी दिला जातो असा आरोप शिंदेगटाकडून होतो.


दूसरीकडे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून घेतलेले काही निर्णय किंवा मंजुर केलेल्या योजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वित्त विभागाने स्थगित केल्या आहेत. यामुळे शिंदे गटात नाराजी आहे. आमच्या निर्णयांना मान्यता दिली जात नाही, अशी भावना निर्माण झाली आहे. आनेक शिंदे गटाचे आमदार ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका यासाठी दिल्या जाणार्‍या निधी बाबतही नाराजी व्यक्त करत आहेत. त्यांच्यामते, त्यांच्या भागात विकास कामं थांबली आहेत त्यातच निधी वेळेवर मिळत नाही.



अजित पवार हे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री या दोन्ही भुमिकांमध्ये अत्यंत ‘कडक’ नियंत्रण ठेवतात. त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून मंजुर होणरी कामे अनेकदा ‘पुनर्विचारसाठी’ परत पाठवली जातात, जे शिंदे गटांच्या आमदारांना अपमानस्पद वाटते. शिंदे गटाने शिवसेना फोडून सत्ता आनली आहे, त्यामुळे ते अधिच सर्व बाबतीत राजकिय हिशोब लावत असतात त्यातच निधी मिळत नसल्याने किंवा त्यांच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने त्यांची असुरक्षीतता अधिक वाढली आहे.



निधी वाटप निर्णय स्थगितीचे हे मुद्दे शिंदे गटाच्या अंतर्गत अस्वस्थेचे प्रमुख कारण आहे. जर हि नाराजी वेळेत हातळली गेली नाही तर याचा परिनाम आगामी काळात महायुतीच्या संबंधावर होऊ शकतो. निधी वाटपावरुनच शिवसेना शिंदेगट महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडला होता, हे विसरुन चालणार नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नुकतेच राज्याच्या तिन दिवसांच्या दौर्‍यावर आले होते. या दौर्‍यावेळी महायुतीमधील तिनही घटक पक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार हे एका मंचावर सहज संवाद साधताना दिसले,तर शिंदे थोडेसे एकाकी वाटले.


काही बैठकीमध्ये शिंदेचा फारसा सहभागही दिसला नाही. त्याचवेळी रायगडावर सुरवातील डावलून एकनाथ शिंदेंना अचानक भाषणाची संधी देण्यात आली. या सर्व घटनाक्रमावरुन महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचे जानवत आहे. त्यासोबतच अमित शाह यांच्या तिन दिवसीय दौर्‍यावेळी पुण्यातील मुक्काम एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित दादा एकत्र बैठक़ीला होते. त्यानंतर मुंबईत शिंदे दोनवेळा एकटेच अमित शाह यांना भेटले.


तर दूसरीकडे रायगड व नाशिक मधील पालकमंत्रीपदाचा वाद सुरु असताना अमित शाह यांना सुनिल तटकरे यांच्या निवास्थानी स्नेहभोजनासाठी घेवून गेले. या स्नेहभोजनावरुन वेगळीच चर्चा रंगली असून रायगडमध्ये भाजपने भरत गोगावले यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केल्याने शिंदे बॅकफुटावर गेले असल्याची चर्चा आहे.

Comments


bottom of page