top of page

महाराष्ट्राच्या राजकिय आखड्याला लागले निवडणुकीचे वेध !

आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी, माजी आमदार शहाजीबापूंचा गौप्यस्फोट


महाराष्ट्रात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्याने राजकिय पक्षांनी वर्चस्वासाठी तयारी सुरू केली आहे. युती, आघाडीच्या चर्चांच्या वावटळीमध्ये आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान, आपल्या पक्षाची बाजू सक्षम करताना विरोधी पक्षांचे उटणे काढण्याची काढण्याची कोणीही संधी सोडत नाही. फोडा फोडीस पोषक वातावरण निर्मितीसाठी जूने दावे, प्रतिदाव्यांचा आधार घेतला जात आहे. ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल’ फेम माजी आमदार शहाजी बापू यांनी पत्रकार परिषदेत आरोप प्रत्यारोपांनी राजकिय आखाडा चांगलाच हुसळवला आहे.


आषाढी वारी काही दिवसांवर येवून ठेपल्याने पंढरपूरमध्ये प्रशासनाकडून वारकरी, भाविकांच्या व्यवस्थेसाठी जोरात तयारी सुरू आहे. लाखो वारकर्‍यांच्या सेवेसाठी पंढरपूर नगरी सजली आहे. त्यातच आज माजी आमदार शहाजी बापू यांनी पत्रकार परिषदेत मोठे दावे प्रतिदावे केले आहेत. यावेळी शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाना साधला आहे. शिवसेना फुटीचा प्रसंग आठवून गुवाहटीवरुन राऊत यांच्या बाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

माजी आमदार शहाजीबापू म्हणाले की, गुवाहाटी येथील बंडामध्ये उद्धव ठाकरे यांना सोडून संजय राऊत यांनाही यायचे होते. पण त्यावेळी 30 ते 35 आमदारांनी राऊत यांना विरोध केला. म्हणून राऊत आजही चिडचिड करून वारंवार एकनाथ शिंदे यांच्यावर टिका करतात. शिवसेना ठाकेर गटातील अनेक आमदारांना एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मान्य आहे, लवकरच राजकीय घडामोडी घडणार असल्याचा गौप्यस्फाटही त्यांनी केला.


ठाकरे गट आणि मनसेच्या युतीवर बोलाना पाटील म्हणाले की, सध्या ठाकरे गट एकत्रीकरणाचा विषय पुढे येतोय. पण काँग्रेससोबत गेलेल्या उद्धव साहेब यांच्या सोबत राज ठाकरे जर गेले तर राज साहेबांनी हिंदुत्व सोडले असे म्हणावे लागेल. आषादी वारीच्या उपाय योजनांवर आधारीत अयोजीत पत्रकार परिषदेत शिवसेना (शिंदे) पक्षाचे माजी आमदार शहाजी बापू बोलत होते.

Comments


bottom of page